bigg boss 16 shiv thakare got appreciation from roadies fame ranvijay singh | "एकेकाळी तू माझ्या..." शिव ठाकरेसाठी 'रोडीज' फेम रणविजयची खास पोस्ट | Loksatta

“एकेकाळी तू माझ्या…” शिव ठाकरेसाठी ‘रोडीज’ फेम रणविजयची खास पोस्ट

नुकत्याच झालेल्या एका टास्कमध्ये मात्र शिव ठाकरेची वेगळी बाजू पाहायला मिळाली. यानंतर ‘रोडीज’ फेम रणविजय सिंहने शिवसाठी खास पोस्ट लिहिली आहे

“एकेकाळी तू माझ्या…” शिव ठाकरेसाठी ‘रोडीज’ फेम रणविजयची खास पोस्ट
(फोटो सौजन्य- रणविजय इन्स्टाग्राम)

‘बिग बॉस’च्या १६ व्या सीझनमध्ये शिव ठाकरे सर्वाधिक चर्चेत राहिलेला सदस्य आहे. नुकत्याच झालेल्या एका टास्कनंतर शिव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग असलेल्या शिव ठाकरेला बिग बॉस १६ च्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जातंय. तो नेहमीच युक्तीने प्रत्येक गेम खेळतो असं घरातील सदस्याही बोलताना दिसतात. पण नुकत्याच झालेल्या एका टास्कमध्ये मात्र शिवची वेगळी बाजू पाहायला मिळाली. या टास्कमध्ये शिव ठाकरे चक्क रडताना दिसला. यानंतर ‘रोडीज’ फेम रणविजयने शिव ठाकरेसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

नेहमीच खंबीरपणे खेळणाऱ्या आणि आपल्या मित्रांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहणाऱ्या शिव ठाकरेची एक वेगळीच बाजू नुकत्याच झालेल्या टास्कमध्ये पाहायला मिळाली. बिग बॉसने घरातील सदस्यांना आपल्या भावना व्यक्त करण्याचा एक टास्क दिला होता. या टास्कमध्ये शिव ठाकरे आपल्या भावना व्यक्त करताना खूप हळवा झाला आणि चक्क रडताना दिसला. त्यानंतर शिवच्या मित्रपरिवारातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून त्याला पाठिंबा दिला आहे. त्यात रणविजयचाही समावेश आहे.

आणखी वाचा- ‘बिग बॉस’शी बोलताना ढसाढसा रडला शिव ठाकरे; वीणाचं नाव घेत म्हणाला, “तिला…”

शिवसाठी शेअर केलेल्या पोस्टमध्ये रणविजयने ‘रोडीज’च्या आठवणींना उजाळा दिला. या पोस्टसह त्याने शिवबरोबरचे फोटोही शेअर केले आहेत. रणविजयने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, “एकेकाळी तू माझ्या टीममध्ये होतास शिव ठाकरे. ही पोस्ट त्यांच्यासाठी ज्यांना माहीत नाही की मी शिव ठाकरेला कसा ओळखतो. ‘रोडीज’च्या वेळी तो माझ्या टीममध्ये होता. त्या संपूर्ण प्रवासात आम्ही वेगवेगळ्या चढ-उतारांना एकत्र समोरे गेलो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो मात्र नेहमीच हसत असायचा. तो खूपच समजूतदार आणि कष्टाळू आहे. तो सर्वांची काळजी घेणारा आणि सर्वांचा आदर करणारा आहे. मी त्याला सर्वच गोष्टींसाठी शुभेच्छा देतो.”

आणखी वाचा- “मी नेहमी तुझ्याबरोबर…” वीणा जगताप आणि शिव ठाकरे पुन्हा येणार एकत्र, पोस्ट चर्चेत

शिव ठाकरेने बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनचं विजेतेपद जिंकण्याआधी ‘रोडीज’चं विजेतेपदही मिळवलं होतं. दरम्यान सध्या त्याचा बिग बॉस १६ मधील खेळही प्रेक्षकांना आवडताना दिसत आहे. रणविजयच्या आधी शिवला पाठिंबा देण्यासाठी त्याची एक्स गर्लफ्रेंड विणा जगतापने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. “वाघ आहेस तू, अजिबात रडायचं नाही.” अशी पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 09:04 IST
Next Story
दिव्या अग्रवालच्या मराठमोळ्या बॉयफ्रेंडने दिलेल्या अंगठीने वेधलं सर्वांचेच लक्ष, अंगठीवर लिहिलंय…