बिग बॉस हिंदीचं १६ वं पर्व दिवसेंदिवस मनोरंजन होत आहे. या आठवड्यात शोमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. मराठमोळा शिव ठाकरे शोमध्ये त्याची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापमुळे चर्चेत आहे. शोमध्ये विकेंड का वारनंतर बिग बॉसनी घरातील सदस्यांना कन्फेशन रुममध्ये बोलवून चर्चा केली होती. त्यावेळी बोलताना शिव रडू लागला आणि त्याने रडत वीणाचं नाव घेतलं होतं. खरं तर शिव व वीणाचा ब्रेक अप झाल्याचं म्हटलं जात होतं. पण अशातच शिवने वीणाचं नाव घेतल्याने दोघांचं खरंच ब्रेक अप झालंय की नाही याबद्दल चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात शिव वीणाबद्दल बोलला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिग बॉस १६ च्या ७ डिसेंबरच्या एपिसोडमध्ये, शिव ठाकरेने बिग बॉस मराठीत त्याची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापबद्दल पहिल्यांदाच बोललाय. तो शोमधील सह-स्पर्धक वीणा जगतापच्या प्रेमात पडला होता आणि नंतर ते रिलेशनशिपमध्ये होते. चाहत्यांनाही त्यांची जोडी खूप पसंतीस पडली होती. या एपिसोडमध्ये, शिवने उघड केलं की त्यांचं ब्रेकअप होऊन आता सात महिने झाले आहेत, पण अजूनही ते मूव्ह ऑन करू शकलेले नाहीत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 16 shiv thakare talks about breakup with ex gf veena jagtap hrc
First published on: 08-12-2022 at 13:41 IST