bigg boss 16 sumbul touqeer dance on pathaan song besharam rang | 'बेशरम रंग'वर सुंबुलने केला डान्स, फराह खान म्हणली, "तू दीपिकाच्या..." | Loksatta

‘बेशरम रंग’वर सुंबुलने केला डान्स, फराह खान म्हणली, “तू दीपिकाच्या…”

बिग बॉस १६ च्या घरात सुंबुलने ‘पठाण’च्या ‘बेशरम रंग’ या गाण्यावर डान्स केला

Sumbul touqeer khan bigg boss 16, sumbul touqeer khan besharam rang dance, anil kapool the night manager, farah khan, pathan worldwide box office collection, pathan box office collection, pathaan boz office collection, besharam rang dance sumbul touqeer khan, bigg boss news, bigg boss news in hindi, television, bollywood, bollywood news, Television Photos, Latest Television Photographs, Television Images, Latest Television photos
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेता शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. त्याच्या या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. त्याचबरोबर चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. अनेक कलाकारांनी ‘बेशरम रंग’ या गाण्यावर डान्स केला असून त्याचे व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अशात बिग बॉस १६ च्या नुकत्याच झालेल्या शुक्रवारच्या एपिसोडमध्ये गाण्याची क्रेझ पाहायला मिळाली. या एपिसोडमध्ये सुंबुल तौकीर खानने जबरदस्त ‘पठाण’च्या ‘बेशरम रंग’ गाण्यावर धम्माल डान्स केला.

अभिनेते अनिल कपूर यांनी बिग बॉस १६ च्या शुक्रवारच्या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. अनिल कपूर त्यांच्या आगामी वेब सीरिज ‘द नाईट मॅनेजर’च्या प्रमोशनसाठी आले होते. यादरम्यान फराह खानने अनिल कपूर आणि घरातील सर्व स्पर्धकांची भेट घालून दिली. अनिल कपूर म्हणाले, “सुंबूल खूप छान नाचू शकते असं ऐकलंय.” त्यांच्या बोलण्यावर सुंबुलने ‘बेशरम रंग’ या गाण्यावर डान्स केला.

आणखी वाचा- ‘पठाण’चे रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन पाहिल्यावर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

सुंबुलने या गाण्यावर स्वतःच्याच स्टाइलमध्ये या गाण्यावर अप्रतिम डान्स मूव्हज केल्या. अनिल कपूर आणि फराह खान यांनी सुंबुलच्या डान्सचं कौतुक केलं. फराह खानने तर, “या गाण्यात तू दीपिकाच्या तुलनेत कुठेच कमी पडली नाहीस.” असं म्हणून सुंबुलचं कौतुक केलं. याशिवाय घरातील सदस्यांनीही सुंबुलच्या डान्सचं कौतुक केलं. सुंबुलच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सुंबुलचे चाहते सतत त्यावर कमेंट करताना आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत आहेत.

आणखी वाचा- Pathaan Viral Scene: पठाण चित्रपटातील तो सीन तुफान व्हायरल, शाहरुख खानच्या जबरा फॅनने दिली सलामी

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पठाण चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ३४.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. मात्र अद्याप अंतिम आकडे समोर आलेले नाही. तर काही ठिकाणी पठाणने तिसऱ्या दिवशी जवळपास ४१ कोटींची कमाई केल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसात १६२ कोटींचा व्यवसाय केला आहे. तर जगभरात या चित्रपटाने २८० ते २९० कोटींच्या कमाईचा आकडा पार केल्याचे बोललं जात आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 19:39 IST
Next Story
“काम देण्याच्या मोबदल्यात त्यांनी माझ्याकडे…” कास्टिंग काऊचबद्दल प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव