scorecardresearch

Bigg Boss 16 : घट्ट मिठी मारली, रडू लागली अन्…; सुंबूल तौकीरच्या जवळच्या मित्राची ‘बिग बॉस’च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री

सुंबूल तौकीरच्या अगदी जवळच्या मित्राची ‘बिग बॉस’च्या घरामध्ये एन्ट्री झाली आहे.

Bigg Boss 16 : घट्ट मिठी मारली, रडू लागली अन्…; सुंबूल तौकीरच्या जवळच्या मित्राची ‘बिग बॉस’च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री
सुंबूल तौकीरच्या अगदी जवळच्या मित्राची 'बिग बॉस'च्या घरामध्ये एन्ट्री झाली आहे.

‘बिग बॉस १६’मधील सध्या चर्चेत असणारी स्पर्धक म्हणजे सुंबूल तौकीर खान. सुंबूल, शालीन भानोत व टीना दत्ताबरोबर तिचं असणारं नातं तर अधिकच चर्चेत आहे. दिवसेंदिवस शालीनशी तिची वाढती जवळीक पाहता सुंबूलला बरंच ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर सुंबूलच्या वडिलांनी तिला दोघांपासून दूर राहण्याचा तसेच त्यांना त्यांची लायकी दाखवण्याचा सल्ला दिला. पण आता आपल्या मुलीने लवकरात लवकर बाहेर पडावं असे सुंबूलचे वडील बोलत आहे. दरम्यान या शोमध्ये एक नवा ट्विस्ट येणार आहे.

आणखी वाचा – Video : “माझ्या मुलीला शिव्या…” टीना दत्ताच्या आईने सुम्बुल तौकीरच्या वडिलांना सुनावलं, तोंडावर लाथ मारण्याचा दिला होता सल्ला

सुंबूलच्या सगळ्या जवळच्या मित्राची ‘बिग बॉस’च्या घरामध्ये एन्ट्री होणार आहे. कलर्स टीव्हीने याबाबतच एक नवा प्रोमो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. यामध्ये ‘बिग बॉस’च्या घरामध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून कोण प्रवेश करणार? हे उघड झालं आहे.

सुंबूलचा अगदी जवळचा मित्र फहमान खानची घरामध्ये एन्ट्री झाली आहे. या दोघांनी ‘इमली’ मालिकेमध्ये एकत्र काम केलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री आणखीनच वाढत गेली. सुंबूल व फहमान एकमेकांना डेट करत असल्याच्याही चर्चा होत्या. आता घरात फहमानला पाहून सुंबूल अगदी खूश झाली आहे.

आणखी वाचा – Video : “हिडीस बाई, मी नाही त्यातली अन् कडी लाव…” टास्कदरम्यान अपूर्वा नेमळेकर व तेजस्विनी लोणारीत जुंपली, व्हिडीओ व्हायरल

फहमान घरात येताच सुंबूल त्याल घट्ट मिठी मारते. तसेच मिठी मारून रडू लागेत. “फहमान आला आहे आता मला दुसरं काहीच नको.” असंही ती म्हणते. एकीकडे सुंबूलला ‘बिग बॉस’मध्ये पाठवल्याचा तिच्या वडिलांना पश्चात्ताप होत आहे. तर दुसरीकडे हा खेळ आता नवं वळण घेणार असल्याचं दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या