scorecardresearch

Video : “‘बिग बॉस’ मला घरी जायचं आहे, इथून बाहेर काढा” टीना दत्ता ढसाढसा रडू लागली, कारण…

टीना दत्ताने ‘बिग बॉस’च्या घरामधून बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video : “‘बिग बॉस’ मला घरी जायचं आहे, इथून बाहेर काढा” टीना दत्ता ढसाढसा रडू लागली, कारण…
टीना दत्ताने 'बिग बॉस'च्या घरामधून बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘बिग बॉस १६’च्या घरात सदस्यांमध्ये असलेल्या नात्यांची गणितं बदलताना दिसत आहेत. ‘बिग बॉस १६’मध्ये लव्ह अँगलही पाहायला मिळाले. शालिन भानोत व टीना दत्ताच्या अफेअरची आजही चर्चा रंगते. सध्या घरामध्ये वातावरण तापलं असताना टीनाला रडू कोसळलं आहे. इतकंच नव्हे तर ‘बिग बॉस’च्या घरामधून बाहेर जायचं असल्याचंही टीनाने यावेळी म्हटलं.

आणखी वाचा – Video : मतभेद, मैत्री, काही वर्ष अफेअर, आठ वर्षांचा संसार अन्…; स्पृहा जोशीच्या नवऱ्याला पहिलंत का? पहिल्यांदाच शेअर केला मजेशीर व्हिडीओ

टीना व सौंदर्यामध्ये येत्या भागात जोरदार भांडण होणार असल्याचं चिन्ह दिसत आहे. हिंदी कलर्स वाहिनीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये टीना व सौंदर्यामधील वाद दिसत आहे. शालीन रूममध्ये बसला असताना टीना तिथे रडत येते.

सौंदर्याविषयी शालीनला रडत रडत टीना काही गोष्टी सांगते. सौदर्या रूममध्ये येऊन “तू चुकीच्या गोष्टीवरुन रडत आहेस.” असं टीनाला बोलते. टीनाला आणखीनच राग अनावर होतो. दरम्यान टीना ढसाढसा रडू लागते.

आणखी वाचा – Video : चित्रीकरण सोडून प्रसाद ओकवर घरातील लादी पुसण्याची आली वेळ, बायकोने राग देताच पुढे काय घडलं पाहा?

शालीन रूममधून बाहेर गेल्यानंतर टीना म्हणते, “‘बिग बॉस’ मला इथे राहायचं नाही. मला माझ्या घरी जायचं आहे. माझ्या घरामध्ये मला खूप प्रेम मिळायचं. माझ्या घरात माझ्याबाबत नकारात्मक बोललं जात नव्हतं.” टीनाचा हा व्हिडीओ पाहून ‘बिग बॉस’ हिला घराबाहेर काढा असं प्रेक्षक म्हणत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 19:06 IST

संबंधित बातम्या