‘बिग बॉस १६’ शोमध्ये स्पर्धकांशी एकमेकांशी असलेले वाद, मैत्री, प्रेम चर्चेचा विषय ठरलं. या शोमध्ये काही सदस्यांच्या रिलेशनशिपच्या बऱ्याच चर्चा रंगल्या. त्यातीलच दोन सदस्य म्हणजे टीना दत्ता व शालीन भानोत. टीना व शालीनमध्ये सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये प्रेमाचं नातं होतं. दोघंही एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. पण आता टीना व शालीन एकमेकांचं तोंडही बघत नाहीत.

आणखी वाचा – इतके वर्ष जगणार प्राजक्ता माळी, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “मला माहित आहे की…”

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
bollywood celebrity charge money for attending funeral
“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”

टीनाने आता शालीनबाबत भाष्य केलं आहे. ‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये टीना म्हणाली, “शालीनबरोबर माझं नाव जोडलं गेलं त्याचा मला आता पश्चाताप होत आहे. जर मी त्याला भेटले नसते तसेच त्याच्याशी मैत्री केली नसती तर माझा प्रवास हा अगदी उत्तम असता. शालीनने माझ्या चारित्र्यावर प्रश्न निर्माण केले.”

“त्याचा राग इतका होता की, त्याने एकदा मला मारण्याचाही प्रयत्न केला. जेव्हा मी त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा मलाच खोटं ठरवलं गेलं. बहुतेक तो उत्तम व्यक्ती नव्हे तर उत्तम अभिनेता आहे.” टीनाने शालीनबाबत राग व्यक्त करत काही गोष्टींचा खुलासा केला.

आणखी वाचा – वीणा जगताप नव्हे तर आईच्या म्हणण्यानुसार अमरावतीच्याच मुलीशी लग्न करणार शिव ठाकरे? म्हणाला, “मी घरी गेल्यावर…”

शिवाय यावेळी टीनाने लग्न करण्याची इच्छाही बोलून दाखवली. ती म्हणाली, “मला आता माझ्या आयुष्यामध्ये कोणीच नको. सध्यातरी मी काम करू इच्छित आहे. लग्न करण्याची माझी इच्छा आहे. तसेच मला आई व्हायचं आहे. ‘बिग बॉस’मध्ये मला इतका त्रास झाला आहे की प्रेम मिळवण्यासाठी मी थोडी वाट पाहणार आहे. माझा आदर व प्रेम करेल अशी व्यक्ती मला हवी आहे.”