‘बिग बॉस १६’मध्ये सध्या फॅमिली वीक सुरू आहे. घरातील सदस्यांचे कुटुंबिय त्यांना भेटण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घरामध्ये आले आहेत. एमसीस्टॅनची आई, शिव ठाकरेची आई, फराह खान, अर्चना गौतमचा भाऊ तसेच निमृत कौर अहलुवालियाच्या वडिलांनीही ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला. आता टीना दत्ता व शालीन भानोतच्या आईने ‘बिग बॉस’मध्ये एण्ट्री केली आहे. यादरम्यानचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – “त्याच मुलीबरोबर तो…” शिव ठाकरेच्या लग्नाबाबत आईचा खुलासा, लेकाच्या रिलेशनशिपबाबतही केलं भाष्य

Distribution of Akshata on the eve of Prime Minister Narendra Modis meeting in Wardha
पंतप्रधान मोदींच्या वर्धेतील सभेच्या पूर्वसंध्येला ‘अक्षता’ वाटप; आधी सभास्थळी झाले होते कलश पूजन
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Narendra Modi at rbi event
“मी पुढचे १०० दिवस व्यस्त, मात्र शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी…”, रिझर्व्ह बँकेला पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

टीना व शालीनमधील नात्याची सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे. तर सलमान खाननेही मागील आठवड्याच्या ‘विकेण्ड का वार’मध्ये टीना व शालीनमधील नातं खोटं असल्याचं सांगितलं. ‘बिग बॉस’च्या घरामध्ये आईला पाहताच टीना रडू लागले. तसेच टीनाची आई तिला मिठी मारते.

टीनाची आई म्हणते, “दहा मुलं जे करू शकत नाहीत ते तू एक मुलगी म्हणून केलं आहेस.” हे ऐकल्यानंतर टीनाला आणखीनच रडू कोसळतं. त्यानंतर गार्डन एरियामध्ये बसून टीना आईला शालीन व तिच्या नात्याबाबत विचारते. यावर टीनाची आईही तिला अगदी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर देते.

आणखी वाचा – Photos : घर, सोन्याचे दागिने अन् शेतजमीन; कोट्यवधींची मालकीण असलेल्या अमृता फडणवीसांवर आहे ६२ लाखांचं कर्ज

“खरंच प्रेम करतो असं तुला वाटतं का?” असं टीना आईला विचारताच प्रेम वगैरे काही नाही असं तिची आई म्हणते. “कोणताच तमाशा, ड्रामा होऊ नये असं मला वाटतं.” असं टीना म्हणते. यावर टीनाची आई म्हणते, “टेन्शन घ्यायचं नाही. मी तुझी आई आहे आणि तू माझी मुलगी आहेस. तू माझी आई नाहीस.” टीनाची आई व शालीनची आई या दोघी घरात एकत्र आल्यावर नेमकं काय काय घडणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.