scorecardresearch

‘बिग बॉस १६’च्या एका आठवड्यासाठी ‘इतके’ लाख रुपये मानधन घ्यायचा एमसी स्टॅन, आतापर्यंत कमावले तब्बल…

‘बिग बॉस १६’ शोसाठी एमसी स्टॅनने किती मानधन घेतलं? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Bigg Boss 16 winner mc stan
‘बिग बॉस १६’ शोसाठी एमसी स्टॅनने किती मानधन घेतलं? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

‘बिग बॉस १६’चा महाअंतिम सोहळा १२ फेब्रुवारीला (रविवारी) पार पडला. रॅपर एमसी स्टॅने सर्वाधिक वोट मिळवत या शोचं विजेतेपद पटकावलं. पुण्यामधील अगदी लहान वस्तीमधून आलेल्या एमसीची आज देशभरात चर्चा आहे. वयाच्या २३व्या वर्षी एमसीला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. पण त्याने आपली कला सादर करत मेहनतीने हे सारं काही कमावलं आहे. शिवाय त्याच्या महागड्या वस्तूंचीही सध्या चर्चा रंगताना दिसत आहे.

आणखी वाचा – “आता त्या व्यक्तीचं तोंडही बघणार नाही” ‘बिग बॉस १६’चं विजेतेपद मिळाल्यानंतर कोणावर भडकला एमसी स्टॅन?

‘बिग बॉस १६’साठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सदस्यांपैकी एमसी स्टॅन एक आहे. ‘बिग बॉस १६’चा विजेता ठरल्यानंतर एमसीला ३४ लाख रुपये मिळाले. शिवाय आय १० ही कारही मिळाली. त्याचबरोबरीने तो ‘बिग बॉस १६’च्या एका आठवड्यासाठी घेत असलेलं मानधनही सध्या चर्चेत आहे. त्याचं मानधन ऐकून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

या शोमध्ये एमसी १९ आठवडे होता. एका आठवड्यासाठी एमसी ७ लाख रुपये मानधन घेत असल्याच्या चर्चा आहे. म्हणजेच त्याने एकूण मिळून १ कोटी ३३ लाख रुपये मानधन घेतलं आहे. शिवाय विजेता झाल्यानंतरची रक्कम मिळून त्याने आतापर्यंत १ कोटी ६४ लाख रुपये कमाई केली.

आणखी वाचा – गर्लफ्रेंडचा छळ, मारहाण, गाण्यांमध्येही शिवीगाळ अन्…; पुण्यात राहणाऱ्या एमसी स्टॅनचं आधी कसं होतं आयुष्य?

एमसीसाठी हे मोठ यश आहे. एमसीस्टॅनची घरातील काही सदस्यांशी असलेली मैत्री चर्चेत राहिली. तर काही सदस्यांशी त्याचं अजिबात पटलं नाही. पण घरातील त्याच्या मित्र-मंडळींशी एमसी खरेपणाने वागला. कितीही वाद-विवाद झाले तरी मित्र-मंडळींची बाजू त्याने सोडली नाही. एमसीमधील हाच खरेपणा प्रेक्षकांनाही भावला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 14:16 IST
ताज्या बातम्या