‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाचा विजेता ठरल्यानंतर रॅपर एमसी स्टॅन सोशल मीडियावर चर्चेत आहे. सर्वाधिक मतं मिळवत स्टॅनने ‘बिग बॉस’ची ट्रॉफी नावावर केली. ‘बिग बॉस’चं विजेतेपद मिळाल्यानंतर स्टॅनच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. स्टॅनच्या इन्स्टाग्रामवरचे फॉलोवर्सही पाच पटीने वाढले आहेत.

‘बिग बॉस हिंदी’चं विजेतेपजद मिळवल्यानंतर एमसी स्टॅनला विविध ब्रँडच्या ऑफरही मिळाल्या आहेत. तसंच त्याच्यावर बक्षिसांचाही वर्षाव झाला आहे. ‘बिग बॉस’च्या चमकणाऱ्या ट्रॉफीबरोबरच एमसी स्टॅनला ३१ लाख ८० हजार रुपये मिळाले. याशिवाय त्याला Hyundai Grand i10 Nios ही गाडीही भेट म्हणून देण्यात आली. याबरोबरच ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांसह अनेक सेलिब्रिटींनी स्टॅनला खास भेटवस्तू दिल्या आहेत. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Punjab and haryana court
ऑस्ट्रेलियात हुंड्यासाठी छळ, भारतात गुन्हा दाखल; पण न्यायलयाने रद्द केला FIR, कारण काय? न्यायमूर्ती म्हणाले…
do these Morning Yoga Stretches after get up early in the morning
VIDEO : सकाळी झोपेतून उठल्यानंतर करा हे पाच योगा स्ट्रेचेस, व्हिडीओ एकदा पाहाच
‘ Good morning, India ?? It wasn’t a dream...’ Hardik Pandya’s heart-warming post after India’s T20 World Cup 2024 win goes viral
“हे स्वप्न नाहीये तर…” विश्वचषक विजयानंतर हार्दिक पांड्याची भारतीयांसाठी खास पोस्ट; चाहत्यांनो एकदा पाहाच
Chris Gayle statement on Virat's performance in 2024 World Cup
IND vs SA Final: युनिव्हर्स बॉसचे विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘त्याला तुम्ही कमी…’
Rishabh Pant 'Casually' Does A Dhoni; Stumps Moeen Ali Nonchalantly Off Axar
IND vs ENG : ऋषभ पंतच्या चपळाईने चाहत्यांना झाली धोनीची आठवण, मोईन अलीच्या स्टंपिगचा VIDEO व्हायरल
plastic, Panvel, plastic bags seized,
पनवेलमध्ये ३७ किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त
Ashwini Koshta mother
पुणे पोर्श अपघात: आरोपीला जामीन मिळताच अश्विनी कोस्टाच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया; म्हणाल्या…
France vs Netherlands in the Euro Football Tournament Controversy caused by a goal disallowed for the Netherlands
नेदरलँड्स-फ्रान्स सामन्याला वादाचे गालबोट; बचावाच्या आघाडीवर झालेल्या लढतीत गोलशून्य बरोबरी

हेही वाचा>> ‘बिग बॉस’च्या घराबाहेर येताच टीना दत्ताबरोबरच्या रिलेशनशिपबाबत शालिन भानोतचं वक्तव्य, म्हणाला “आमच्यात जे काही झालं…”

हेही वाचा>> निमृत कौरबरोबरच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर शिव ठाकरेने सोडलं मौन, म्हणाला “माझ्या हृदयात…”

एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खानने एमसी स्टॅनला ब्रेसलेट गिफ्ट म्हणून दिलं आहे. याची किंमत १५ लाख रुपये इतकी आहे. तर बादशाहने रॅपरला ५० लाख किमतीची सोन्याची चेन गिफ्ट केल्याची माहिती आहे. याशिवाय रोहित शेट्टीने स्टॅनला मिनी कूपर कार भेट म्हणून दिली आहे. याची किंमत ४५ लाखांच्या घरात आहे. अब्दू रोजिकने स्टॅनला सहा लाख किमतीचं घड्याळ दिलं आहे. तर साजिद खानने डायमंड चेन भेट म्हणून दिली आहे.

हेही वाचा>> ‘बिग बॉस’ विजेत्या रॅपरचे फॉलोवर्स पाच पटीने वाढले; एमसी स्टॅनला रणवीर सिंगही करतो फॉलो, फॉलोवर्सची संख्या आहे तब्बल…

एमसी स्टॅनला त्याच्या गर्लफ्रेंडकडूनही खास गिफ्ट मिळालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, स्टॅनची गर्लफ्रेंड बुबाने त्याला ४५ लाखांची बीएमडब्ल्यू बाईक गिफ्ट म्हणून दिली आहे. ‘बिग बॉस’च्या पर्वाचा विजेता ठरल्यानंतर एमसी स्टॅन मालामाल झाला आहे.