scorecardresearch

एमसी स्टॅनचं नशीब उजळलं! शाहरुख खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा

‘बिग बॉस’ फेम एमसी स्टॅन करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

mc stan in shah rukh khan movie
'बिग बॉस' फेम एमसी स्टॅन करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘बिग बॉस हिंदी’चं सोळावं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं. पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन या पर्वाचा विजेता ठरला. ‘बिग बॉस हिंदी’चं विजेतेपद पटकावल्यानंतर स्टॅनच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. सोशल मीडियावर फक्त एमसी स्टॅनची क्रेझ पाहायला मिळत आहे.

‘बिग बॉस’चं विजेतेपद जिंकल्यानंतर एमसी स्टॅन भलताच चर्चेत आला आहे. स्टॅनला अनेक ब्रॅण्डकडून जाहिरातींच्या ऑफरही आल्या आहेत. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक साजिद-वाजिदने स्टॅनला चित्रपटात गाणं ऑफर केल्याची चर्चा होती. स्टॅनचे साजिद-वाजिदबरोबरचे फोटोही व्हायरल झाले होते. आता स्टॅनच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या चित्रपटातून स्टॅन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा>> सुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आल्याचं समजताच अभिनेत्रीची वहिनी चिंतेत, म्हणाली, “दीदी तुम्ही…”

एका फॅन पेजवरुन करण्यात आलेल्या ट्वीटमुळे स्टॅन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. जवानच्या निर्मात्यांनी चित्रपटासाठी स्टॅनशी संपर्क साधल्याचं या ट्वीटमध्ये म्हटलं गेलं आहे. परंतु, याबाबत चित्रपटाच्या टीमकडून अजून कोणतीही ऑफिशिअल माहिती देण्यात आलेली नाही. एमसी स्टॅनच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चांमुळे त्याचे चाहतेही आनंदी आहेत.

हेही वाचा>>आजारी आईला भेटायला गेलेला नवाजुद्दीन सिद्दीकी, सख्ख्या भावाने बाहेरचा रस्ता दाखवला अन्…; व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>> शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर SEBI ने बंदी घातल्यानंतर अर्शद वारसीचं ट्वीट, अभिनेता म्हणाला “कष्टाने कमावलेला पैसा…”

‘बिग बॉस’चा विजेता ठरल्यानंतर एमसी स्टॅनच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. स्टॅनच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्समध्ये वाढ झाली आहे. चाहत्यांसाठी स्टॅन खास भारत दौरा करणार आहे. यामध्ये देशातील विविध शहरात त्याचे कॉन्सर्ट होणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 20:32 IST