scorecardresearch

Bigg boss 16: विजेता स्पर्धक होणार मालामाल, बक्षीस म्हणून मिळणार तब्बल ‘इतके’ लाख

शिव ठाकरे, अर्चना गौतम, स्टॅन, शालीन भानोत आणि प्रियांका चौधरी या चार जणांमध्ये ‘बिग बॉस १६’चा ग्रँड फिनाले रंगणार आहे.

bigg boss 16

‘बिग बॉस’ हिंदीच हे १६वं पर्व सुरू आहे. पहिल्या दिवसापासूनच हे पर्व यंदाच्या स्पर्धकांमुळे चर्चेत आलं होतं. हे पर्व संपायला शेवटचे काही दिवस उरले आहेत. आता लवकरच या पर्वाचा ग्रँड फिनाले होणार आहे. यंदाची ट्राफिक कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले दिसत आहे. पण ट्रॉफी बरोबरच यंदाचा विजेता किती रक्कम घरी घेऊन जाणार याच्याही चर्चा रंगल्या आहेत.

नुकतीच या पर्वाच्या टॉप पाच स्पर्धकांची नावे समोर आली. त्यातून काल घरातून मिड वीक एव्हिक्शन झालं असून निम्रत कौर बाहेर पडली. आता शिव ठाकरे, अर्चना गौतम, स्टॅन, शालीन आणि प्रियांका चौधरी या चार जणांमध्ये ‘बिग बॉस १६’चा ग्रँड फिनाले रंगणार आहे. आता या चार जणांमधून विजेतेपद कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नुकतीच ‘बिग बॉस १६’च्या ट्रॉफीची पहिली झलक दाखवण्यात आली. यंदाची ट्रॉफी आत्तापर्यंतच्या असलेल्या ट्रॉफींपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि खास आहे. यावेळी ‘बिग बॉस १६’ च्या ट्रॉफीमध्ये एक युनिकॉर्न बनवण्यात आला आहे, जो चांदी आणि सोनेरी रंगाचा आहे.

आणखी वाचा : Bigg Boss 16: अर्चना गौतमचा ९ वर्षांपूर्वीच्या ऑडिशनचा व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्रीने दिलेल्या उत्तरांनी रवी किशनही झालेले आवाक्

‘बिग बॉस १६’च्या विजेता स्पर्धकासाठी यंदा बक्षिसाची रक्कम ५० लाख रुपये ठरवण्यात आली होती. मात्र घरातील सदस्यांनी टास्कदरम्यान त्यातील अर्ध्याहून अधिक रक्कम गमावली. बिग बॉसने घरातील सदस्यांना गमावलेली बक्षीस रक्कम परत मिळवण्याची अनेक वेळा संधी दिली आहे, पण कोणालाही यश आलं नाही. त्यानुसार आता अखेर बिग बॉस १६ च्या विजेत्या स्पर्धकाला २१ लाख ८० हजार ही रक्कम मिळणार आहे. फिनालेमध्ये मनी बॅग टास्क असेल. सूटकेसमध्ये १० किंवा २० लाख रुपयांची रक्कम असेल. त्या सुटकेससह अंतिम फेरीच्या शर्यतीतून कोण बाहेर पडणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

हेही वाचा : ‘बिग बॉस १६’ शिव ठाकरेसाठी ठरलं खास! आता झळकणार सलमान खानच्या चित्रपटात?

‘बिग बॉस १६’च्या ग्रँड फिनालेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हा फेब्रुवारीपासून या कार्यक्रमाचा फिनालेविक सुरू झाला आहे. तर १२ फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले रंगेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 14:46 IST
ताज्या बातम्या