‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वातील स्पर्धकांची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. अंकिता लोखंडेपासून ते मुनव्वर फारुखी, मनारा, निल-ऐश्वर्या अशा प्रत्येक स्पर्धकाने आपली खेळी दाखवून एक नवा चाहता वर्ग तयार केला आहे. दररोज या स्पर्धकांचे व्हिडीओ, त्यांनी केलेली बिग बॉसच्या घरातील वक्तव्य चर्चेत असतात. अशातच बिग बॉसच्या घरातून एक स्पर्धक बेघर झाला आहे. लंडनमधील फार्मासिस्ट आणि टीव्ही पर्सनालिटी नावेद सोल एलिमिनेट झाला आहे. नावेदच्या एलिमिनेशनने घरातील इतर स्पर्धेक खूप भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. पण बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर नावेदने अभिषेक कुमारबरोबर असलेल्या रिलेशनशिपविषयी काही खुलासे केले; जे ऐकून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

अलीकडच्या भागामध्ये बिग बॉसने विकी जैन, अरुण माशेट्टी, सनी आर्या, सना रईस खान आणि अनुराग डोवाल यांना आर्काइव्ह रूममध्ये बोलावले आणि सांगितले की, आज मला तुमच्याकडून परफॉर्मन्स रिव्ह्यू घ्यायचा आहे. यानंतर बिग बॉसने त्यांना तीन स्पर्धकांची नावे सांगण्यास सांगितली, ज्यांना याआधीच शोमधून बाहेर काढायला पाहिजे होते. यावर सर्वांनी जिग्ना व्होरा, रिंकू धवन आणि नावेद सोल यांची नावं सांगितली. त्यानंतर नावेद बेघर होण्यासाठी एलिमिनेट झाला. नावेदने शो बाहेर होताच अनेक खुलासे करत अभिषेक कुमारबरोबर असलेल्या रिलेशनशिपविषयी बोलला आहे.

Bigg Boss Marathi netizens slams arbaz for aggressive behaviour
Video : टास्कमध्ये धक्काबुक्की, जोरदार राडा…; अरबाजचं ‘ते’ रुप पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “संग्राम भाऊ…”
bigg boss marathi arbaz and wildcard sangram chougule huge fight in captaincy task
अखेर दोन रांगडे गडी एकमेकांना भिडणार! संग्राम-अरबाजमध्ये कोण मारणार बाजी? कॅप्टन्सी टास्कचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले…
Bigg Boss Marathi 5
Video : निक्की तांबोळीच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे अंकिता-अभिजीतमध्ये भांडण, म्हणाला,”स्वत: …”
trp online bigg boss marathi grabs third place
‘प्रेमाची गोष्ट’ला टाकलं मागे! ‘बिग बॉस मराठी’ची ऑनलाइन TRP मध्ये मोठी झेप; पाहा संपूर्ण यादी…
Arbaaz Patel And Nikki Tamboli
अरबाजची गर्लफ्रेंड लीझा गरोदर? जवळच्या व्यक्तीने केला खुलासा; म्हणाली, “निक्की तांबोळी…”
priyadarshini indalkar diagnosis dengue
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकरला झाला डेंग्यू; ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाली…
bigg boss marathi abhijeet fight with nikki
“तुझ्याशी बोलतो हीच चूक…”, अभिजीतने संपूर्ण घरासमोर निक्कीला सुनावलं; दोघांच्या मैत्रीत फूट, काय आहे कारण?
Arbaaz Patel And Nayera Ahuja
“ज्या दिवशी मी…”, ‘स्प्लिट्सव्हिला’तील अरबाजची पार्टनर नायराचे मोठे वक्तव्य; म्हणाली, “ज्या मुलीवर नजर पडेल ती…”
tharala tar mag fame jui gadkari make ukdiche modak on set
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर जुई गडकरीने बनवले उकडीचे मोदक! नेटकरी कौतुक करत म्हणाले, “सर्वगुण संपन्न…”

हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत झळकले ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक; साकारतायत ‘ही’ भूमिका

एका एंटरटेनमेंट वृत्तसंस्थेशी संवाद साधताना नावेद म्हणाला की, मी आणि अभिषेक एकमेकांवर खूप प्रेम करतो. मला अभिषेकला अजून जाणून घ्यायचं होतं, त्यामुळे मला बिग बॉसच्या घरात राहायचं होतं. अभिषेक माझा क्रश असून मी त्याच्यावर खूप जास्त प्रेम करतो. जरी अभिषेक आक्रमक असला तरी तो स्वच्छ मनाचा आहे.

हेही वाचा – Video: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यादरम्यान शाहरुख खानने रणवीरकडे दुर्लक्ष करत दीपिका पदुकोणला मारली मिठी? व्हिडीओ झाला व्हायरल

पुढे नावेद म्हणाला, “मला असं वाटतंय की, जर मी अजून काही काळासाठी बिग बॉसच्या घरात राहिलो असतो तर अभिषेक ज्याप्रकारे रडत होता त्यावरून वाटतंय त्याची आणि माझी जोडी झाली असते. तो ईशासाठी कधीच इतका रडला नव्हता. त्याने मला प्रपोज पण केलं होतं आणि किस सुद्धा केली होती. आमचं नातं अतूट होतं. मला त्याला पुन्हा भेटायला खूप आवडेल. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे.”