Bigg Boss 18 : हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. हा तिसरा आठवडादेखील सदस्यांमधील वादाने सुरू झाला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात १९व्या दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडला. या नॉमिनेशन टास्कमध्ये एक ट्विस्ट पाहायला मिळाला. नेमकं काय घडलं? आणि घराबाहेर जाण्यासाठी कोण-कोण नॉमिनेट झालं? जाणून घ्या…

नॉमिनेशन टास्क दरम्यान ‘बिग बॉस’ने श्रुतिका अर्जुनला मोठा अधिकार दिला. ‘बिग बॉस’ने श्रुतिकाला नवी लाडकी म्हणून घोषित केलं. लाडकी बनवण्याबरोबर तिला काही खास अधिकार दिले. या अधिकारांतर्गत श्रुतिकाला कोणता सदस्य किती जणांना नॉमिनेट करणार हे ठरवायचं होतं. ‘बिग बॉस’ने दिलेल्या अधिकाराचा वापर करून श्रुतिकाने करणवीर मेहरा, सारा अरफीन खान आणि शिल्पा शिरोडकरला सर्वात जास्त म्हणजेच तीन सदस्यांना नॉमिनेट करण्याचा अधिकार दिला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटात स्त्रीची एन्ट्री? श्रद्धा कपूर घेणार ‘या’ अभिनेत्रीची जागा

कोण सदस्य नॉमिनेट झाले?

तसंच श्रुतिकाने अविनाश मिश्रा आणि एलिस कौशिक यांच्याकडून इतर सदस्यांना नॉमिनेट करण्याचा अधिकार हिसकावून घेतला. यावेळी श्रुतिका आणि अविनाशमध्ये जोरदार वाद झाले. टास्कच्या अखेरीस अविनाश मिश्रा, विवियन डीसेना, रजत दलाला, मुस्कान बामने आणि नायरा बनर्जी घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाल्याचं ‘बिग बॉस’ने जाहीर केलं. त्यामुळे आता या पाच सदस्यांमधून कोण तिसऱ्या आठवड्यात बेघर होतंय? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

हेही वाचा – Video: ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर सलमान खानचा जबरदस्त डान्स पाहिलात का? वैशाली माडेला लावलं होतं गायला, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा – Video: १०० भाग पूर्ण झाल्यानिमित्ताने ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेच्या सेटवर कलाकारांचा जल्लोष, नितीश चव्हाणने केला भन्नाट डान्स

दरम्यान, ‘बिग बॉस १८’च्या घरात आता दोन गट झाल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. एका गटात अविनाश मिश्रा, ईशा सिंह, एलिस कौशिक, विवियन डीसेना, रजत दलाल आणि तजिंदर बग्गा हे आहेत. तर दुसऱ्या गटात करणवीर मेहरा, अरफीन खान, सारा अरफीन खान, शिल्पा शिरोडकर आणि इतर सदस्य असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून २२ ऑक्टोबरच्या भागात सुरुवातीला शिल्पा शिरोडकर रडताना दिसली. विवियनने अविनाशच्या गटाबरोबर हात मिळवणी केल्याचं शिल्पा शिरोडकरला अजिबात पटलं नाही. त्यामुळे ती भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

Story img Loader