Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात नुकताच टॉप-६ सदस्यांचा आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला. हे पाहून सर्वच सदस्य भारावून गेले. विवियन डिसेना, करणवीर मेहरा, चुम दरांग, अविनाश मिश्रा, रजत दलाल आणि ईशा सिंह या सहा सदस्यांमधून कोण ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता होणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. १९ जानेवारीला रात्री ९.३० वाजल्यापासून यंदाच्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. सध्या प्रत्येक सदस्याच्या चाहत्यांकडून जोरदार व्होटिंग होतं असल्याचं दिसत आहे. अशातच महाअंतिम सोहळ्याआधी ‘बिग बॉस’च्या घरात काही गोष्टी घडल्या आहेत? ज्याचे प्रोमो व्हायरल झाले आहेत.

‘बिग बॉस’च्या १८व्या ( Bigg Boss 18 ) पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याआधी आणखी एक पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत घरातील सहा सदस्यांच्या समर्थकांनी सडेतोड उत्तर दिली आहेत. याशिवाय एकमेकांची खिल्ली उडवण्याचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केला. यावेळी चुम दरांग करणवीर मेहराची जबरदस्त खिल्ली उडवताना पाहायला मिळाली.

Bigg Boss Marathi Fame Vikas Patil Celebrate Vishal Nikam birthday
Video: ही दोस्ती तुटायची नाय…; बऱ्याच दिवसांनी ‘बिग बॉस मराठी’ फेम विशाल निकम-विकास पाटीलची झाली भेट, पाहा व्हिडीओ
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Shocking video of man abuses woman on road hit her harassment video viral on social media
“अरे तू माणूस की हैवान?”, भररस्त्यात माणसाने हद्दच पार केली; महिलेबरोबर काय केलं पाहा; VIDEO पाहून बसेल धक्का
Video Shows Bride groom Beautiful moment
VIDEO: भटजीबुवांचा स्वॅग! नवरीच्या बोटात अंगठी जाईना हे पाहून भटजींनी केला विनोद; लग्नमंडपात पिकला एकच हशा
karan veer mehra second wife Nidhi Seth talks about husband sandip kumar
अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, पतीबद्दल म्हणाली, “तो खूपच…”
Shocking video A person saved from dying in pursuit of goodness thrown into the air by a bull
बापरे! चांगलं करण्याच्या नादात मरता मरता वाचली व्यक्ती; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?
Bigg Boss Marathi fame Ankita prabhu Walawalkar share special post after visit akkalkot
“आपल्याला मुद्दाम चुकीचं का दाखवलं गेलं?” ‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकरच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली…
Colors Marathi Bigg Boss Marathi season 5 will be re-broadcasted
Bigg Boss Marathi 5: पुन्हा एकदा तोच राडा अन् ‘भाऊचा धक्का’ पाहायला मिळणार; तारीख, वेळ जाणून घ्या…

हेही वाचा – ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री, ‘बिग बॉस मराठी’शी आहे खास कनेक्शन

चुम दरांगचा व्हिडीओ ‘व्हिजन बॉलीवूड’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये चुम म्हणते की, करणच्या केसांना कलर लावते. पाठ दुखायला लागली तर मसाज करते. एनर्जीसाठी जेवण बनवून देते. करण तुला गर्लफ्रेंडची नाहीतर नर्सची गरज आहे. हे ऐकून करणसह अविनाश जोरजोरात हसताना दिसत आहेत.

हेही वाचा – प्रेमाची गोष्ट: तेजश्री प्रधान आणि अपूर्वा नेमळेकरच्या मैत्रीत दुरावा, इन्स्टाग्रामवर एकमेकींना केलं अनफॉलो अन्…

यावेळी ईशा सिंहने शायरीतून इतर सदस्यांना चांगलाच टोला लगावला आहे. ईशा म्हणाली, “कहते हैं कभी अविनाश की परछाई, तो कभी विवियन परछाई. कोई बनाता रहे अ‍ॅप्स, कोई बनाता रहे कॉफी, पर तुम्हारे नाक के निचेसे ये लडकी उठाके ले जायेगी ट्रॉफी.”

हेही वाचा – हळद लागली! ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्याच्या हळदीचे फोटो आले समोर, पाहा

दरम्यान, ‘बिग बॉस खबरी’च्या माहितीनुसार व्होटिंगमध्ये करणवीर मेहरा अव्वल स्थानावर आहे. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत करणवीर मेहराला ३१ टक्के, विवियन डिसेनाला २८ टक्के, रजत दलालला २५ टक्के, चुम दरांगला १० टक्के, अविनाश मिश्राला ४ टक्के आणि ईशा सिंहला २ टक्के व्होटिंग मिळालं आहे.

Story img Loader