Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचे दिवस जसजसे पुढे जात आहेत तसे घरातील समीकरण बदलताना दिसत आहेत. घरात दोन गट आहेत. पण काही सदस्य या दोन्ही गटातून खेळताना दिसत आहेत. तर काही सदस्य ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत आहेत. अशातच दिवाळीच्या मुहूर्तावर ‘बिग बॉस’च्या घरात मोठा धमाका होणार आहे. दोन दमदार वाइल्ड कार्डची एन्ट्री होणार असल्याचं समोर आलं आहे. तसंच एका वाइल्ड कार्ड सदस्याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची घोषणा झाल्यापासून वाइल्ड कार्डच्या एन्ट्रीची चर्चा आहे. अनेक तर्क-वितर्क ‘बिग बॉस’च्या प्रेक्षकांकडून लावले जात आहेत. बऱ्याच सेलिब्रिटींच्या नावाची चर्चा आहे. पण, आता ही प्रतीक्षा संपली आहे. ‘बिग बॉस १८’च्या घरात दिवाळीच्या मुहूर्तावर दोन दमदार वाइल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री होणार आहे.
हेही वाचा – Video: मायरा वायकुळच्या चिमुकल्या भावाचा दिवाळीचा पहिला दिवस ‘असा’ केला साजरा, पाहा व्हिडीओ
हे दोन वाइल्ड कार्ड सदस्य दमदार यासाठी आहेत, कारण त्यांनी याआधी एक रिअॅलिटी शो गाजवला होता. हा रिअॅलिटी शो म्हणजे ‘स्प्लिट्सविला १५’. हा शो जिंकण्यासाठी या वाइल्ड कार्ड सदस्यांची थोडक्यात संधी हुकलेली. पण, सगळ्यांची मनं जिंकून गेलेली ही जोडी ‘बिग बॉस १८’च्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून येणार आहे.
‘स्प्लिट्सविला १५’मधील लोकप्रिय दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूर ‘बिग बॉस १८’मध्ये वाइल्ड कार्ड म्हणून लवकरच प्रवेश करताना दिसणार आहेत. याबाबतची माहिती ‘बिग बॉस तक’ या एक्स पेजवर देण्यात आली आहे. तसंच दिग्विजय सिंह राठीचा प्रोमोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे दिग्विजयची वाइल्ड कार्ड एन्ट्री निश्चित आहे. पण, दिग्विजयच्या पाठोपाठ कशिश कपूरदेखील ‘बिग बॉस’च्या घरात गेली आहे. मात्र, तिचा अजून कुठलाही प्रोमो समोर आलेला नाही.
Digvijay Singh Rathee and Kashish Kapoor to enter #BiggBoss18 house as Wild Card contestant pic.twitter.com/1GgG00AArY
— #BiggBoss_Tak? (@BiggBoss_Tak) October 31, 2024
दरम्यान, ३१ ऑक्टोबरच्या भागात नवा ‘टाइम गॉड’ विवियन डिसेनाला ‘बिग बॉस’च्या अग्निपरीक्षेला सामोर जावं लागलं. ही अग्निपरीक्षा म्हणजे दोन सदस्यांना जेलमध्ये पाठवणं. यावेळी सर्वात आधी विवियनने सर्व सदस्यांचं याबाबत मत जाणून घेतलं. त्यानंतर विवियने रजत दलाल आणि श्रुतिकाला जेलमध्ये पाठवण्याचा निर्णय जाहीर केला. पण, ‘बिग बॉस’ने जेलमध्ये जाणाऱ्या सदस्यांच्या अधिकारात बदल केला.
याआधी जेलमध्ये असणाऱ्या दोन सदस्यांना रेशन वाटपाचा अधिकार देण्यात आला होता. पण, आता वेगळा अधिकार देण्यात आला आहे. रजत आणि श्रुतिकाला ‘बिग बॉस’ने दररोज घरात जेवणासाठी कोणते पदार्थ बनणार, हे ठरवण्याचा अधिकार दिला आहे.