Bigg Boss 18 Double Eviction : ‘बिग बॉस 18’ शो टीआरपीच्या बाबतीत खूप मागे पडला आहे. अशातच आता शोमध्ये या आठवड्यात डबल एलिमिनेशन झाले आहे. या आठवड्यात दोन सदस्य घरातून बाहेर पडले. या दोघीही अभिनेत्री आहे. बिग बॉसमध्ये आलेल्या या ट्विस्टने घरातील स्पर्धक आणि प्रेक्षकही चकित झाले आहे. या आठवड्यात एलिमिनेट होणारी पहिली स्पर्धक मुस्कान बामने आहे. आता आणखी एका सदस्याची घरातून एक्झिट झाल्याची बातमी समोर येत आहे.
बिग बॉस 18 शी संबंधित अपडेट्स देणाऱ्या ‘बिग बॉस तक’नुसार, नायरा बॅनर्जीला डबल एलिमिनेशनमध्ये घरातून बाहेर काढण्यात आलं आहे. ती बेघर होण्यासाठी आधीच नॉमिनेट होती, मात्र डबल एलिमिनेशन होईल याची कल्पना कुणालच नव्हती. मुस्काननंतर नायरा बिग बॉसमधून बाहेर पडली आहे. ४०० जोडी कपडे घेऊन बिग बॉसच्या घरात गेलेली नायरा अवघ्या २० दिवसांत बेघर झाली. फिनालेपर्यंत जाईल असा विश्वास असलेल्या नायराचा प्रवास खूप लवकर संपला.
मुस्कान बॅनर्जीच्या एव्हिक्शननंतर नायरा डेंजर झोनमध्ये होती, नंतर तिलाही घराबाहेर काढण्यात आलं. बिग बॉस १८ मध्ये अनेक नवनवीन प्रयोग करण्यात आले, मात्र तरीही हा शो प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी होऊ शकलेला नाही. अवघ्या २० दिवसांत जवळपास पाच स्पर्धक बाद झाले आहेत.
सर्वात आधी बिग बॉसच्या घरातून गधराजला बाहेर काढण्यात आलं. पेटाच्या याचिकेनंतर बिग बॉसच्या निर्मात्यांनी गधराजला काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते बिग बॉसमधून बाहेर पडले. मग हेमा शर्मा एलिमिनेट झाली. त्यानंतर आता मुस्कान व नायरा दोघीही बिग बॉसच्या घराबाहेर आल्या आहेत.
हेही वाचा – पृथ्वीक प्रतापच्या पत्नीचे नाव काय? दोघांचे लग्नाआधीचे फोटो पाहिलेत का?
अविनाश व करणवीरची शाळा घेणार सलमान
या आठवड्यातील ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान अविनाश मिश्रा व करणवीर या दोघांची शाळा घेणार आहे. तसेच या एपिसोडमध्ये चाहत व अविनाश यांच्या आई येतील. या दोघींमध्ये शाब्दिक वाद होताना प्रोमोमध्ये दिसतंय. एकूणच या आठवड्यातील ‘वीकेंड का वार’ फारच रंजक होणार आहे.