When and Where to watch Bigg Boss 18 Grand Finale : १५ आठवड्यांच्या प्रवासानंतर बिग बॉस १८ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या या शोचा ग्रँड फिनाले या वीकेंडला होणार आहे. ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या या शोमध्ये अनेक स्पर्धक सहभागी झाली आणि अनेक एलिमिनेट झाले. शोला टॉप सहा फायनलिस्ट मिळाले असून त्यापैकी एक जण विजेता होईल. तुम्हीही बिग बॉसचे चाहते असाल, तर या शोचा ग्रँड फिनाले केव्हा, कुठे पाहता येईल, विजेत्याला काय बक्षीस मिळणार आणि यंदाची ट्रॉफी कशी आहे, त्याबद्दल जाणून घ्या.

या आठवड्यात श्रुतिका अर्जुन, चाहत पांडे व शिल्पा शिरोडकर हे तीन सदस्य एलिमिनेट झाले, त्यानंतर आता घरात सहा स्पर्धक आहेत. या सहापैकी एकजण बिग बॉसची ट्रॉफी जिंकेल.

karan veer mehra second wife Nidhi Seth talks about husband sandip kumar
अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, पतीबद्दल म्हणाली, “तो खूपच…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Bigg Boss Marathi fame Ankita prabhu Walawalkar share special post after visit akkalkot
“आपल्याला मुद्दाम चुकीचं का दाखवलं गेलं?” ‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकरच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली…
Kanye West Wife Bianca Censori naked in Grammy Awards 2025 videos and photos viral
Grammy Awards 2025: ‘ग्रॅमी पुरस्कार’ सोहळ्याच्या रेड कार्पेटवर प्रसिद्ध रॅपरची पत्नी झाली नग्न, व्हिडीओ अन् फोटो झाले व्हायरल
Colors Marathi Bigg Boss Marathi season 5 will be re-broadcasted
Bigg Boss Marathi 5: पुन्हा एकदा तोच राडा अन् ‘भाऊचा धक्का’ पाहायला मिळणार; तारीख, वेळ जाणून घ्या…
Bigg Boss marathi Ankita Prabhu Walawalkar invite to raj Thackeray for wedding
‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकरने राज ठाकरेंना दिलं लग्नाचं निमंत्रण, होणाऱ्या पतीसह गेली होती ‘शिवतीर्था’वर
Shilpa Shirodkar
शिल्पा शिरोडकर ‘बिग बॉस १८’मध्ये गेल्यावर महेश बाबूने पाठिंबा का दिला नाही? अभिनेत्री म्हणाली, “त्यांना गर्विष्ठ…”
Bigg Boss 18 Fame Rajat Dalal talk about chahat pandey and controversy
Video: चाहत पांडेचं नाव ऐकताच रजत दलालने जोडले हात, विनंती करत म्हणाला…

Bigg Boss 18 चा ग्रँड फिनाले कधी, कुठे पाहायचा?

When, where to watch Bigg Boss 18 grand finale: बिग बॉस १८ चा ग्रँड फिनाले १९ जानेवारी २०२५ रोजी प्रसारित होणार आहे. १५ आठवड्यांच्या प्रवासानंतर या शोचा ग्रँड फिनाले रविवारी रात्री ९.३० वाजता कलर्स चॅनलवर पाहता येईल. तसेच बिग बॉसचा ग्रँड फिनाले जिओ सिनेमावर लाइव्ह पाहता येईल.

विजेत्याला किती रक्कम मिळणार?

Bigg Boss 18 Prize Money: या पर्वातील विजेत्याला बक्षीस म्हणून ५० लाख रुपये मिळतील. तसेच स्पॉन्सर्सकडून इतरही काही भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. निर्मात्यांनी ठराविक पैसे घेऊन शो सोडण्याचा पर्याय फिनालेमध्ये ठेवल्यास ती रक्कम विजेत्याच्या रकमेतून वजा होऊ शकते.

हेही वाचा – “ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?

बिग बॉस १८ ची ट्रॉफी पाहिलीत का?

Bigg Boss 18 Trophy: बिग बॉस १८ च्या ट्रॉफीचा फोटो समोर आला आहे. यंदाची ट्रॉफी ही १३ व्या पर्वातील ट्रॉफी सारखी आहे, असं चाहत्यांना वाटतंय. बिग बॉसच्या १३ व्या पर्वाचा विजेता दिवंगत सिद्धार्थ शुक्ला होता.

bigg boss 18 trophy photo
बिग बॉस १८ ची ट्रॉफी (फोटो – बिग बॉस तक एक्सवरून साभार)

फिनालेमध्ये पोहोचलेले सदस्य

Bigg Boss 18 Finalists: बिग बॉस १८ ला टॉप सहा सदस्य मिळाले आहेत. करणवीर मेहरा, चुम दरांग, रजत दलाल, विवियन डिसेना, अविनाश मिश्रा व इशा सिंह हे बिग बॉस १८ चे फायनलिस्ट आहेत.

हेही वाचा – घुसखोर जेहच्या पलंगाकडे गेला अन्…; सैफ अली खानच्या मदतनीसने सांगितला घटनाक्रम

स्पर्धकांना वोट कसे करायचे?

बिग बॉस १८ चा विजेता ठरवण्यासाठी वोटिंग लाइन्स अजून ओपन आहेत. चाहते त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी मतदान करू शकतात. त्यासाठी त्यांना जिओ सिनेमाच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. अॅपवरूनही ते आपल्या आवडत्या स्पर्धकाला मत देऊ शकतात.

Story img Loader