Bigg Boss 18 Gunaratna Sadavarte : ‘बिग बॉस’चा हिंदी सीझन यंदा ६ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. यावेळी घरात अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी एन्ट्री घेतली आहे. अवघ्या आठवड्याभरातच ते सर्वांच्या पसंतीस उतरले आहेत. आपल्या अनोख्या शैलीने त्यांनी घरात एक रंगतदार वातावरण निर्माण केल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी पहिल्याच वीकेंडच्या वारला सलमान खानने सुद्धा त्यांचं कौतुक केलं. त्यामुळे एकंदर त्यांचं एक वेगळं रुप प्रेक्षकांना ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला मिळत आहे.
गुणरत्न सदावर्तेंचा ( Gunaratna Sadavarte ) सध्या आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते चक्क डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या ९० च्या दशकातील क्रश ज्येष्ठ अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांनी सोमवारच्या ( १४ ऑक्टोबर ) भागात लोकप्रिय बॉलीवूड गाण्यावर डान्स केल्याचं पाहायला मिळालं. सदावर्तेंनी घरात ते कॉलेजच्या दिवसांमध्ये शिल्पाचे चाहते असल्याचं मान्य केलं आहे.
बिग बॉसने घेतली सदावर्तेंची फिरकी
शिल्पा शिरोडकर यांनी १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम’ चित्रपटात अनिता प्रताप सिंग ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील ‘सनम मेरे सनम’ हे गाणं शिल्पा शिरोडकर आणि गोविंदा यांच्यावर चित्रित झालं आहे. या ९० च्या दशकातील लोकप्रिय रोमँटिक गाण्यावर सदावर्तेंनी शिल्पा शिरोडकर यांच्यासह डान्स केला. ‘बिग बॉस’च्या घरातील त्यांचा हा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
गुणरत्न ( Gunaratna Sadavarte ) व शिल्पा यांचा डान्स पाहून ‘बिग बॉस’ने या दोघांची चांगलीच फिरकी घेतली. Bigg Boss म्हणाले, “तुम्ही काय सुंदर परफॉर्मन्स सादर केला…मजा आली. मला खात्री आहे की, तुमची पत्नी जयश्री यांना सुद्धा हा डान्स खूप जास्त आवडेल.” यानंतर घरात एकच हशा पिकतो. पुढे बिग बॉस म्हणतात, “एक गोष्ट लक्षात ठेवा…चुकून त्यांनी ( जयश्री ) शिल्पावर केस केली तर, तुम्हाला शिल्पा यांच्या बाजूने ही केस लढावी लागेल.” यावर गुणरत्न होकार दर्शवतात.
#GunaratnaSadavarte Ne Kia Shilpa Ke Sath Romantic Dance .#BiggBoss18 #bb18 #shilpashirodkar #gunaratansadawarte
— lalan kumar (@lalanku43371287) October 14, 2024
pic.twitter.com/e3mYyjYQSc
तसेच “आयुष्यात मी पहिल्यांदाच अभ्यास, पुस्तकांच्या बाहेर येऊन अशाप्रकारे जीवन जगतोय” अशा भावना व्यक्त करत शेवटी गुणरत्न सदावर्ते ( Gunaratna Sadavarte ) ‘बिग बॉस’चे आभार मानतात.