Bigg Boss 18 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा ६ ऑक्टोबरला पार पडला. त्याच दिवशी हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा ग्रँड प्रिमियर झाला. एकूण १८ सदस्यांसह एका गाढवाने यंदा ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे. चाहत पांडे, शेहजादा धामी, अविनाश मिश्रा, शिल्पा शिरोडकर, तजिंदर पाल सिंह बग्गा, श्रुतिका अर्जुन, नायरा बनर्जी, चुम दरंग, करण मेहरा, रजत दलाल, मुस्कार बामने, अरफीन खान, सारा अरफीन खान, ईशा सिंह, हेमा शर्मा, विवियन डिसेना, एलिस कौशिक आणि गुणरत्न सदावर्ते हे १८ सदस्य सहभागी झाले आहेत.

पहिल्या दिवसांपासून ‘बिग बॉस’च्या घरात हंगाम सुरू झाला आहे. चाहत पांडे ही ‘बिग बॉस’च्या घरातील पहिली सदस्य होती; जिला जेलमध्ये राहायचे होते किंवा तिच्या जागी इतर कुठल्याही दोन सदस्यांना जेलमध्ये राहण्यासाठी चाहतला मनधरणी करायची होती. यावेळी तजिंदर पाल सिंह बग्गा आणि ‘व्हायरल भाभी’ म्हणजेच हेमा शर्मा चाहतच्या जागी जेलमध्ये जाण्यास तयार झाले. त्यानंतर अनेक सदस्यांमध्ये तू तू में में पाहायला मिळाली. कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून सदस्यांमध्ये वाद होतं होते. असं असलं तरी दुसऱ्याबाजूला गुणरत्न सदावर्ते यांची भाजपा नेते तजिंदर बग्गा यांच्याशी चांगले सूर जुळलेले पाहायला मिळाले. दोघं एकमेकांशी गप्पा मारताना दिसले. यावेळी तजिंदर यांनी गुणरत्न सदावर्तेंना सिद्धू मुसेवालासंबंधित काही गोष्टी सांगितल्या. आठ दिवसांपूर्वी तजिंदर यांनी सिद्धू मुसेवालाचा मृत्यू होणार असल्याची भविष्यवाणी केल्याचं त्यांनी सदावर्तेंना सांगितलं.

Bigg Boss 18 rajat dalal shayari on Vivian dsena group watch video
Bigg Boss 18: रजत दलालने शायरीतून विवियन डिसेनाच्या ग्रुपला लगावला टोला; नेटकरी म्हणाले, “एक नंबर भाई…”
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
bigg boss marathi jahnavi killekar visit suraj chavan hometown
जान्हवीने ‘ते’ वचन निभावलं! पती अन् मुलासह पोहोचली सूरजच्या गावी; किरण किल्लेकर दोघांबद्दल म्हणाले, “Bigg Boss च्या घरात…”
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
Bigg Boss 18 wild card kashish Kapoor target eisha singh watch promo
Bigg Boss 18: वाइल्ड कार्ड सदस्यांमुळे ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरण तापलं, कशिश कपूरने ‘या’ सदस्याला केलं टार्गेट, म्हणाली…
bigg boss marathi irina rudakova wishes happy bhaubeej to dhananjay powar
“Happy भाऊबीज भावा”, कोल्हापुरात धनंजय पोवारने केलेला पाहुणचार पाहून इरिना भारावली! म्हणाली, “नुसतं प्रेम…”
Bigg Boss 18 Vivian Dsena Gives New Name To Karan Veer Mehra
Bigg Boss 18: विवियन डिसेनाने करणवीर मेहराला दिलं नवीन नाव, म्हणाला…
Bigg Boss 18 alice kaushik gave death threat to karan veer Mehra
Bigg Boss 18: “मला करणवीरचा जीव घ्यायचा आहे”, एलिस कौशिकने दिली थेट धमकी, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

हेही वाचा – Video : सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंतने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन, ‘बिग बॉस’ची ट्रॉफी ठेवली बाप्पाच्या चरणी

नुकताच ‘कलर्स टीव्ही’वर एक प्रोमो आला आहे. ज्यामध्ये गुणरत्न सदावर्ते तजिंदर यांच्यासाठी आवाज उठवताना दिसत आहेत. “पहले उन्हें आजाद करो, फिर रोटी की बात करो”, अशा घोषणा गुणरत्न सदावर्ते देताना पाहायला मिळत आहेत.

प्रोमोमध्ये, सदावर्ते तजिंदर यांना ‘सत श्री अकाल’ करत असतात. तेव्हा हेमा म्हणते, “तुम्ही फक्त बग्गाजी, बग्गाजी का करता? हेमाजी, हेमाजी का करत नाही?” त्यावर गुणरत्न म्हणतात, “त्यांनी माझ्या हृदयात जागा बनवली आहे.” त्यानंतर किचनमधून सदावर्ते जोरात ओरडत म्हणतात की, बग्गाजींबरोबर या जन्मात माझं नातं तुटणार नाही. यावर सदस्य हसताना दिसत आहे. पुढे गुणरत्न म्हणतात, “पहले उन्हें आजाद करो, फिर रोटी की बात करो. बग्गाजींना सोडा, लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.” या प्रोमोमध्ये गुणरत्न सदावर्तेंचा एक वेगळाचा अंदाज पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: “त्यांची तोंडं बंद केलीस…”, सूरज चव्हाणच्या विजयावर सुरेखा कुडची यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी सुरुवातीपासून…”

दरम्यान, अभिनेत्री ईशा सिंहनंतर गुणरत्न सदावर्तेंची ‘बिग बॉस १८’मध्ये जबरदस्त एन्ट्री झाली होती. यावेळी सलमान खानने ईशाला सदावर्तेंची अशी ओळख करून दिली की, हे गुणरत्न सदावर्ते आहेत. बोल्ड आणि डॅशिंग पर्सनालिटीमुळे संपूर्ण महाराष्ट्र यांना ओळखतो. त्यानंतर गुणरत्न यांनी स्वतः ईशाला ओळख करून दिली. यावेळी ते म्हणाले, “मी असा वकील आहे, ज्याचं कौतुक सलमान खानने केलं आहे. मी हे म्हणेन की, ना पेशी होगी ना गवाही होगी. अब तुम हमारे क्लाइंट बनगो तो जो भी हुज्जत होगी ओ खतम होगी.” गुणरत्न सदावर्तेंची ही डायलॉगबाजी ऐकून सलमान खानला हसू अनावर झालं होतं.