Bigg Boss 18 : ‘बिग बॉस’च्या १८ व्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सलमान खान संपूर्ण सुरक्षेसह शुक्रवारी रात्री ‘वीकेंड का वार’साठी बिग बॉसच्या सेटवर पोहोचला होता. यंदाच्या आठवड्यात घरातील एकूण १० सदस्य बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाले होते. यांच्यापैकी सलमानने कोणाला बाहेरचा रस्ता दाखवला याची माहिती एपिसोड ऑन एअर होण्याआधीच समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या घरात या आठवड्यात पार पडलेल्या नॉमिनेशन प्रक्रियेनंतर तेजिंदर सिंह बग्गा, मुस्कान बामने, रजत दलाल, अविनाश मिश्रा, चाहत पांडे, श्रुतिका अर्जुन, शिल्पा शिरोडकर, हेमा शर्मा, करणवीर मेहरा आणि एलिस कौशिक हे एकूण १० सदस्य ‘बिग बॉस’च्या घरातून बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाले होते. त्यांच्यापैकी येत्या वीकेंडला घराचा निरोप कोण घेणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. अखेर ‘वीकेंड का वार’साठी सलमान सेटवर दाखल झाला. त्याने सुरुवातीला सर्व सदस्यांची शाळा घेतली. यानंतर यावेळी घरातून हेमा शर्मा एलिमिनेट झाल्याची बातमी समोर आली आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : आश्रमावर हातोडा, रडून-रडून सायली हतबल, पण अर्जुन करणार असं काही…; विशेष भागात काय घडणार? पाहा प्रोमो

‘बिग बॉस तक’ने एक्स पोस्ट शेअर करत हेमा शर्मा घराबाहेर झाल्याचं सांगितलं आहे. हेमा १८ व्या पर्वातून एलिमिनेट होणारी पहिली सदस्य आहे. कारण, यापूर्वी गाढवाला नियमांनुसार घराबाहेर काढण्यात आलं. पुढे, वैयक्तिक कामासाठी सदावर्तेंनी शोमधून एक्झिट केली. तर, अविनाशला एव्हिक्शनमधून वाचवून जेलमध्ये पाठवण्यात आलं होतं. त्यामुळे अधिकृतपणे ‘वीकेंड का वार’मधून एलिमिनेट होणारी पहिली स्पर्धक हेमा शर्मा ठरली असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ‘बिग बॉस’च्या जवळपास सगळ्या फॅन पेजेसवर हेमाने घराचा निरोप घेतल्याचं वृत्त देण्यात आलं आहे.

हेमाच्या एव्हिक्शनंतर तिचे फॅन्स प्रचंड नाराज झाले आहे. ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतल्यावर हेमाला सुरुवातीचे काही दिवस तेजिंदर सिंह बग्गाबरोबर जेलमध्ये घालवावे लागले होते. आता कुठे तिच्या मूळ खेळाला सुरुवात झाली होती आणि तेवढ्याच तिचा घरातील प्रवास संपल्याने हेमाचे चाहते नाराज झाले आहेत.

हेही वाचा : गौहर खानचा एक्स बॉयफ्रेंड १३ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात, कबुली देत लग्नाबाबत म्हणाला, “मी हे नातं…”

Bigg Boss 18

हेमा शर्मा लोकप्रिय अभिनेत्री व डान्सर म्हणून ओळखली जाते. याशिवाय ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. हेमाचे फॅन्स तिला ‘व्हायरल भाभी’ म्हणून ओळखतात आणि याच नावाने ती सर्वत्र ओळखली जाते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 18 hema sharma got evicted from house first elimination of the season reports sva 00