Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात नुकताच टाइम गॉडचा टास्क पार पडला. या टास्कमध्ये करणवीर मेहरा, रजत दलाल, श्रुतिका अर्जुन, दिग्विजय सिंह राठी, चाहत पांडे, सारा अरफीन खान सदस्य खेळले. यावेळी या सहा सदस्यांना टाइम गॉड होण्यासाठी टाइम ऑफ गॉड स्टाफ एका हाताने धरून ठेवायचा होता. दुसरा हात त्याला लावायला नव्हता. तसंच स्टाफ पकडून ठेवलेला हात उचलायचा नव्हता. यादरम्यान हृतिकची लाइफ कोच असलेली सारा बाद झाली आणि तिने गोंधळ घातला.

टाइम गॉडच्या टास्कमधून बाद झाल्यानंतर साराने ‘बिग बॉस’ पक्षपाती असल्याचा आरोप करत विवियनला वस्तू फेकून मारली. त्यानंतर साराने ईशाचे केस खेचत तिला उशी फेकून मारली. शिवाय अविनाशला देखील मारल्याचं तो म्हणाला. साराने घरात नुसता राडा घातला. तिचा हा अवतार पाहून पती अरफीन खानला रडू कोसळले. आपली मुलं तुला बघत असतील म्हणत अरफीनने देखील बिग बॉस पक्षपाती असल्याचा आरोप केला.

Bigg Boss 18 ekta Kapoor slams on Vivian dsena watch promo
Bigg Boss 18: एकता कपूरने ‘बिग बॉस’च्या लाडक्या विवियन डिसेनाला चांगलंच झापलं, म्हणाली, “तुला लाँच केल्यानंतर मी…”
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Bigg Boss 18 Rupali Bhosle fire on Vivian dsena
Bigg Boss 18: रुपाली भोसले भडकली ‘बिग बॉस १८’मधील ‘या’ सदस्यावर; सिद्धार्थ शुक्लाचा उल्लेख करत म्हणाली, “हा अहंकार…”
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Aroh Welankar New Villa
Bigg Boss फेम अभिनेत्याने पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला! चाहत्यांना दाखवली पहिली झलक, मराठी कलाकारांनी केलं कौतुक
Bigg Boss Marathi Ankita Walawalkar Meets Suraj Chavan
अखेर भेट झालीच! होणाऱ्या नवऱ्यासह अंकिता पोहोचली बारामतीला; सूरजच्या गावच्या शेतात बसून मारला ‘या’ पदार्थावर ताव
Veena Jagtap
“तू मरत का नाहीस?” बिग बॉसनंतर करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना; अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या घरीही…”
bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

हेही वाचा – Video: पहिल्यांदाच लाडक्या लेकीबरोबर दिसले दीपिका पादुकोण अन् रणवीर सिंह, एअरपोर्टवरील व्हिडीओ होतोय व्हायरल

‘बिग बॉस १८’च्या या पाचव्या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी चाहत पांडे, सारा अरफीन खान, अरफीन खान, तजिंदर बग्गा हे चार सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले. या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रियेत ‘बिग बॉस’ने सदस्यांना नॉमिनेट करण्याचे संपूर्ण अधिकार टाइम गॉड म्हणजेच विवियन डिसेनाला दिले होते. नॉमिनेशन प्रक्रियेची जंगली ऑक्टोपसची थीम होती. या जंगली ऑक्टोपसची भूक शांत करण्यासाठी विवियनला आठ सदस्यांचा बळी चढवायचा होता. यावेळी विवियन पूर्णपणे पक्षपाती खेळला. त्याने आपल्या ग्रुपमधील आणि फेव्हरट सदस्यांना नॉमिनेट होण्यापासून सुरक्षित ठेवलं.

सर्वात आधी विवियनने रजत दलालला नॉमिनेट केलं. त्यानंतर चाहत पांडे, श्रुतिका अर्जुन, सारा अरफीन खान, अरफीन खान, करण मेहरा, तजिंदर बग्गा आणि चुम दरांग या आठ जणांना घराबाहेर जाण्यासाठी विवियनने नॉमिनेट केलं. पण यादरम्यान ‘बिग बॉस’ने एक ट्विस्ट आणला. ‘बिग बॉस’ने एकूण आठ सदस्यांपैकी चार जणांना सुरक्षित करण्याचा अधिकार घरातील सदस्यांना दिला. ज्या सदस्याला चार पेक्षा अधिक जण मतं देतील तो सुरक्षित होणार होता. घरातील सदस्यांनी चार पेक्षा अधिक मतं देऊन रजत दलाल, करणवीर मेहरा, चुम दरांग, श्रुतिका अर्जुन या चार जणांना सुरक्षित केलं. त्यामुळे आता चाहत पांडे, सारा अरफीन खान, अरफीन खान, तजिंदर बग्गा नॉमिनेट झाले.

हेही वाचा – Bigg Boss 18: एकता कपूरने ‘बिग बॉस’च्या लाडक्या विवियन डिसेनाला चांगलंच झापलं, म्हणाली, “तुला लाँच केल्यानंतर मी…”

काही दिवसांपूर्वी नॉमिनेट झालेल्या सदस्यांमधील सारा अरफीन खान एलिमिनेट झाल्याचं समोर आलं होतं. पण, सारा नव्हे तर पती अरफीन खान ‘बिग बॉस’च्या घराबाहेर झाला आहे. याबाबत ‘बिग बॉस खबरी’ या इन्स्टाग्राम पेजवर माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’नंतर ‘स्टार प्रवाह’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद; तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर केलं अधिराज्य

आतापर्यंत ‘बिग बॉस १८’च्या घरातून गुणरत्न सदावर्ते, हेमा शर्मा, मुस्कान बामने, नायरा बनर्जी, शहजादा धामी हे पाच सदस्य एलिमिनेट झाले आहेत. आता अरफीन खान गेल्यानंतर ‘बिग बॉस १८’मध्ये फक्त १४ सदस्य राहतील. दरम्यान, अरफीन खान आणि सारा अरफीन खान अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींसह दिग्गज मंडळींचे लाइफ कोच आहेत. ‘बिग बॉस १८’मध्ये येण्याआधी हृतिक रोशनने स्वतः अरफीन आणि साराची ओळख करून दिली होती. दोघं हृतिक रोशनचे खूप चांगले मित्र आहेत.

Story img Loader