Bigg Boss 18 : हिंदी ‘बिग बॉस’चं १८वं पर्वं दिवसेंदिवस रंगदार होतं चाललं आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून सतत घरामध्ये रेशनवरून जोरदार वाद सुरू आहेत. गेल्या आठवड्यात अविनाश मिश्राला रेशन वाटपाचा अधिकार देण्यात आला होता. तिसऱ्या आठवड्यात हा अधिकार अविनाशसह अरफीन खानला सुद्धा देण्यात आला आहे. तरीदेखील रेशनवरील वाद काही संपायचं नाव घेत नाहीये.

२४ ऑक्टोबरच्या भागात रेशनसाठी नवा टास्क देण्यात आला. ज्यामध्ये सदस्यांना रेशनसाठी वैयक्तिक वस्तू पणाला लावायच्या होत्या. त्यानंतर त्या सदस्याला अरफीन आणि अविनाशकडे वैयक्तिक वस्तूच्या बदल्यात रेशन मागायचं होतं. अरफीन आणि अविनाश कोणत्या सदस्याला किती रेशन द्यायचं हे निश्चित करणार होते. यावेळी शिल्पा शिरोडकरने सर्वात आधी जाऊन पती आणि मुलीचा फोटो पणाला लावला. त्या बदल्यात तिने बरंच रेशन मागितलं. पण अरफीन आणि अविनाशने फक्त तूप दिलं. अशातच प्रकारे पुढे टास्क झाला. यादरम्यान अरफीन आणि अविनाशने काही जणांना वस्तू पणाला लावूनही रेशन दिलं नाही. तर काही जणांनी वस्तू पणाला न लावून रेशन न घेण्याचा निर्णय घेतला. अशातच आता हेमा शर्मानंतर आणखी सदस्य रातोरात बेघर झाल्याचं समोर आलं आणि हा निर्णय योग्य असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
ankita walawalkar aka kokan hearted girl replied to netizen
“गावी कोणीही या मुलीचं Welcome केलं नाही” नकारात्मक कमेंट करणाऱ्या युजरला अंकिताने सुनावलं; म्हणाली, “मी मुद्दाम…’
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
neha gadre marathi actress announces pregnancy
इंडस्ट्री सोडून विदेशात झाली स्थायिक; ‘ही’ मराठी अभिनेत्री लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई! बाळाच्या जन्माआधी केलं जेंडर रिव्हिल
Veena Jagtap
“तू मरत का नाहीस?” बिग बॉसनंतर करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना; अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या घरीही…”
bigg boss marathi nikki tamboli and arbaz patel video call
निक्की तांबोळीने केला सूरज चव्हाणला Video कॉल! सोबतीला होता अरबाज; म्हणाली, “भावा लवकरच…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा – हिंदी चित्रपटसृष्टीला ‘बॉलीवूड’ नाव कसं पडलं? याचा अर्थ काय आहे? जाणून घ्या…

‘बिग बॉस तक’च्या माहितीनुसार, हेमा शर्मानंतर ‘अनुपमा’ फेम मुस्कान बामनेला एलिमिनेट केलं आहे. ‘एक्सपायरी सून’ टास्कमुळे मुस्कानला रातोरात घराबाहेर जावं लागलं आहे. या आठवड्यात नॉमिनेशन टास्क दरम्यान ‘बिग बॉस’ने श्रुतिका अर्जुनला मोठा अधिकार दिला. ‘बिग बॉस’ने श्रुतिकाला नवी लाडकी म्हणून घोषित केलं. लाडकी बनवण्याबरोबर तिला काही खास अधिकार दिले. या अधिकारांतर्गत श्रुतिकाला कोणता सदस्य किती जणांना नॉमिनेट करणार हे ठरवायचं होतं. ‘बिग बॉस’ने दिलेल्या अधिकाराचा वापर करून श्रुतिकाने करणवीर मेहरा, सारा अरफीन खान आणि शिल्पा शिरोडकरला सर्वात जास्त म्हणजेच तीन सदस्यांना नॉमिनेट करण्याचा अधिकार दिला.

तसंच श्रुतिकाने अविनाश मिश्रा आणि एलिस कौशिक यांच्याकडून इतर सदस्यांना नॉमिनेट करण्याचा अधिकार हिसकावून घेतला. यावेळी श्रुतिका आणि अविनाशमध्ये जोरदार वाद झाले. टास्कच्या अखेरीस अविनाश मिश्रा, विवियन डीसेना, रजत दलाला, मुस्कान बामने आणि नायरा बनर्जी घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते. यामधून आता मुस्कान बेघर झाली आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्तेंना ‘बिग बॉस’मध्ये पुन्हा जाण्यासाठी जगभरातून चाहत्याचे येतायत फोन, पत्नी अनुभव सांगत म्हणाल्या, “काहीजण रडतात अन्…”

मुस्कानला घराबाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय नेटकऱ्यांना योग्य वाटतं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “योग्य निर्णय आहे. ती एक निरागस मुलगी आहे. ‘बिग बॉस’ या शोसाठी ती बनली नाहीये. तिला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.” तसंच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, प्रामाणिकपणे, हे तिच्यासाठी खरंच चांगलं आहे. ती या शोसाठी बनली नाहीये. त्यामुळे ती भविष्यातील प्रोजेक्टमध्ये चांगलं काम करेल, अशी माझी आशा आहे. तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “बरं झालं. तिचं ‘बिग बॉस १८’मध्ये काहीच योगदान नाहीये.”

Story img Loader