Bigg Boss 18 : सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची जोरदार चर्चा सुरू आहे. पहिल्या दिवसापासून या पर्वात वाद, राडे पाहायला मिळत आहेत. सध्या पाचव्या पर्वाचा तिसरा आठवडा चालू आहे. अशातच दुसऱ्या बाजूला हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची देखील चर्चा रंगली आहे. या पर्वाची तयारी सुरू झाली आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या या वादग्रस्त व बहुचर्चित ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री झळकणार असल्याचं समोर आलं आहे.

‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व संपल्यापासून ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची ( Bigg Boss 18 ) चर्चा सुरू आहे. या पर्वाबाबत अनेक वृत्त सातत्याने येत आहे. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सलमान खानबरोबर अब्दू रोजिक होस्ट करणार असल्याचं वृत्त आलं होतं. तसंच यापर्वातील काही निश्चित झालेल्या स्पर्धकांची नावं देखील समोर आली आहेत. प्रसिद्ध युट्यूबर मिथिलेश पटनाकर, आकृति नेगी, जसवंत बोपन्ना, दिग्विजय राठी, सीवेट तोमर, शाइनी आहुजा, पायल मलिक, कृतिका मलिक, अर्जुन बिजलानी, करण पटेल, समीरा रेड्डी, सुरभि ज्योति, पूजा शर्मा, शोएब इब्राहिम, दलजीत कौर आणि इशा कोपिकर यांना ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वासाठी विचारणा झाल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये ‘आई कुठे आई करते’ मालिकेतील अभिनेत्रीचं नाव देखील सामील असल्याचं समोर आलं आहे.

Suraj Chavan
“जर सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली तर मी पुढचा सीझन बघणार नाही”, असं का म्हणाली अभिनेत्री?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Yogita Chavan
“योगिता चव्हाण बिग बॉस आणि महाराष्ट्राला मूर्ख…”, पहिल्या पर्वातील मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत
yogita chavan first reaction after eviction
“चुकीचे शब्द, लायकी काढणं…”, घराबाहेर आल्यावर योगिताची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “वर्षाताईंना खूप टार्गेट केलं”
surekha kudachi praises riteish Deshmukh
“रितेश भाऊ…”, जान्हवीला जेलमध्ये टाकल्यावर सुरेखा कुडची यांची पोस्ट; म्हणाल्या, “अरबाज – निक्की आणि ती…”
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
Pandharinath Kamble
“मी पॅडीबरोबर शो केला आहे, तो टास्कमध्ये नेहमी…”, अभिनेत्रीने केली पंढरीनाथ कांबळेच्या गेमची पोलखोल
jahnavi husband kiran killekar supports wife
“लोकांनी उगाच अर्थाचा अनर्थ…”, जान्हवीला नवऱ्याकडून पाठिंबा! किरण किल्लेकरांची पहिली प्रतिक्रिया आली समोर

हेही वाचा – Bigg Boss Marathi : अंकिता, धनंजय यांना अजूनही अभिजीत सावंतवर आहे डाउट, गॉसिप करताना म्हणाले, “आपलंच नाणं खोटं…”

Bigg Boss 18
Bigg Boss 18 (Photo Credit – Indian Express)

गेल्या कित्येक वर्षांपासून ‘आई कुठे काय करते’ मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले हिला ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वासाठी ( Bigg Boss 18 ) विचारणा झाल्याचं म्हटलं जात आहे. ‘राजश्री मराठी’च्या खात्रीशीर सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे. अद्याप रुपाली भोसलेने स्वतः याबाबत कोणतीही माहिती दिली नाहीये.

हेही वाचा – ‘कलर्स मराठी’च्या ‘दुर्वा’ मालिकेत झळकणार ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्री, प्रोमो शेअर करत म्हणाली…

दरम्यान, याआधी अभिनेत्री रुपाली भोसले ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाली होती. या पर्वात रुपालीने आपल्या खेळीने अनेकांची मनं जिंकली. ती या पर्वातील टॉप-१० स्पर्धक असून ७० दिवसांनंतर ती बिग बॉसच्या घराबाहेर झाली होती.