‘बिग बॉस हिंदी’ आणि अभिनेता सलमान खान यांचं एक वेगळंच समीकरण तयार झालेलं आहे. ‘बिग बॉस हिंदी’च्या बऱ्याच सीझनचं होस्ट सलमान खानने केलं आहे. या रिअ‍ॅलिटी शोचा चाहतावर्ग सलमानच्या होस्टिंगला कायमच पसंती देत आला आहे. नुकतंच सलमानच्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे ‘बिग बॉस १८’ संदर्भात आता नवीन माहिती समोर आली आहे.

‘बिग बॉस शो’ म्हटला की सलमानचं होस्टिंग हे पाहिजेच! या विधानाशी ‘बिग बॉसप्रेमी’ कायमच सहमती दर्शवतात. घरातील भांडण, आरडाओरडा आणि टास्कमध्ये चुकीच्या पद्धतीने खेळली जाणारी रणनीती या सगळ्याचं बारकाईने निरीक्षण करत, सलमान त्याच्या हटके स्वॅगमध्ये स्पर्धकांवर ताशेरे ओढतो, तेे पाहताना प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येते. अशातच बिग बॉसचा १८ वा सीझन लवकरच येणार असल्याचं काही दिवसांपूर्वी सांगितलं गेलं. मात्र, या रिअ‍ॅलिटी शोच्या १८ व्या सीझनचं होस्टिंग सलमान करणार नसल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगत होत्या.काही दिवसांपुर्वीच सलमान खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यामुळे सलमान बिग बॉसच्या १८ व्या सीझनमध्ये दिसणार नाही असं त्याच्या चाहत्यांना वाटत होतं. मात्र, आता या सगळ्या चर्चांना स्वत: सलमान खानने पूर्णविराम दिल्याचं दिसून येत आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Arbaaz Patel father comments on his son relationship with Nikki tamboli
“कुठेतरी फेक वाटतंय”, निक्कीबरोबर असलेल्या रिलेशनशिपवर अरबाज पटेलच्या वडिलांचं भाष्य, म्हणाले…
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
jahnavi killekar upset on suraj chavan captaincy
Video : सूरजची कॅप्टन्सी जान्हवीला खुपली! रागात थेट विचारला जाब अन् नंतर झाली भावुक; नेटकरी म्हणाले, “४ दिवस चांगलं…”
Bigg Boss Marathi 5 Bhaucha Dhakka
Bigg Boss Marathi : “बाप काढायचा नाही…”, भाऊच्या धक्क्यावर निक्कीला मोठी शिक्षा! रितेश संतापून म्हणाला, “इथून पुढे…”
bigg boss marathi season 5 pranit hatte angry on nikki tamboli
“निक्कीने बिग बॉसला विकत घेतलं आहे…”, मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “रितेश देशमुख काही बोलले नाही तर…”
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
bigg boss marathi suraj chavan is the new captain of the house
Video : ‘झापुक झुपूक’ म्हणत सूरज चव्हाण झाला घराचा नवीन कॅप्टन! निक्कीने मारली मिठी, रुमच्या पाया पडला अन्…; पाहा प्रोमो
bigg boss marathi these seven contestants are nominated
Bigg Boss Marathi : घरातील एकूण ७ सदस्य झाले नॉमिनेट! ‘त्या’ निर्णयामुळे नेटकरी वर्षा-अंकितावर नाराज, नेमकं काय घडलं?

‘इ टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, सलमानने बिग बॉस हिंदीच्या १८ व्या सीझनचा प्रोमो नुकताच शूट केला आहे. या संदर्भातील सलमानचा व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ बिग बॉस १८ च्या सेटवरील असल्याचं कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.

हेही वाचा- ‘बिग बॉस’ फेम जय दुधाणेच्या घरी आली नवीन पाहुणी; खरेदी केली आलिशान गाडी, कुटुंबासह शेअर केला फोटो

प्रोमो शूट करतानाचा सलमानचा व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये सलमानने निळ्या रंगाचं शर्ट आणि त्यावर काळ्या रंगाचा सूट वेअर केला आहे. या व्हिडीओत एक वृद्ध महिला सलमानचं कौतुक करताना दिसत आहे. सलमानचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असून तो शूटिंगला आल्याचं कळताच चाहत्यांची गर्दी जमली होती. सलमान आता पुन्हा त्याच्या डॅशिंग अंदाजात या नव्या सीझनचं होस्टिंग करणार आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’प्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा- हृतिक रोशनबरोबर सुझान खानचा बॉयफ्रेंडचं नातं कसं आहे? स्वतः उत्तर देत म्हणाला…

सध्या ओटीटीवर सुरू असलेल्या ‘बिग बॉस’च्या सीझनला प्रेक्षक वर्ग चांगलीच पसंती देत आहे. मात्र, टेलिव्हिजनवर सुरू होणारा १८ वा सीझन आणि त्यात असलेलं सलमान खानचं होस्टिंग या सगळ्याबद्दल चाहत्यांनी सोशल मीडियावर लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. ‘बिग बॉस’ १८ सीझनचा प्रोमो लवकरच पाहायला मिळणार असून येत्या ऑक्टोबरमध्ये हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं म्हटलं जात आहे. या नव्या सीझनमध्ये कोणकोणते स्पर्धक असू शकतील आणि कोणाचा या घरात निभाव लागेल, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.