Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा सध्या चौथा आठवडा सुरू आहे. आतापर्यंत ‘बिग बॉस १८’च्या घरातून चार सदस्य घराबाहेर झाले आहेत. आता बेघर होणाऱ्या पाचव्या सदस्याचं नाव देखील समोर आलं आहे. तसंच शिल्पा शिरोडकरसह नॉमिनेट झालेले सहा सदस्य सुरक्षित झाले आहेत.

चौथ्या आठवड्यातली नॉमिनेशन प्रक्रिया करंट देऊन झाली होती. म्हणजे ज्या सदस्याला नॉमिनेट केलं जाणार होतं, त्याला करंटचा झटका दिला गेला. नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा शहजादा कन्सेशन रूममध्ये गेला होता. शहजादाने एलिस आणि शिल्पा शिरोडकरला घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केलं. त्यानंतर प्रत्येक सदस्य कन्सेशन रूममध्ये जाऊन नॉमिनेट करत होता. यावेळी जेव्हा चुम दरांगला कन्सेशनरुममध्ये बोलावलं. तेव्हा चुमने जाण्याआधी नॉमिनेट करणाऱ्या सदस्यांची माफी मागितली. हेच ‘बिग बॉस’ला खटकलं. त्यामुळे ‘बिग बॉस’ने चुम दरांगकडून नॉमिनेट करण्याचा अधिकार परत घेतला. तिला कन्सेशनरूममध्ये जाताना रोखलं. यावेळी सर्व सदस्यांनी चुमला ‘बिग बॉस’ची माफी मागायला सांगितली. पण तिने माफी मागितली नाही. त्यानंतर पुढची नॉमिनेशन प्रक्रिया सुरळीत पार पडली.

Bigg Boss 18 Rupali Bhosle fire on Vivian dsena
Bigg Boss 18: रुपाली भोसले भडकली ‘बिग बॉस १८’मधील ‘या’ सदस्यावर; सिद्धार्थ शुक्लाचा उल्लेख करत म्हणाली, “हा अहंकार…”
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Bigg Boss 18 hrithik roshan life coach arfeen khan Evicted from salman khan
Bigg Boss 18: हृतिक रोशनच्या लाइफ कोचला दाखवला ‘बिग बॉस’च्या घराबाहेरचा रस्ता, ‘हे’ सदस्य झाले सुरक्षित
Veena Jagtap
“तू मरत का नाहीस?” बिग बॉसनंतर करावा लागलेला ट्रोलिंगचा सामना; अभिनेत्री म्हणाली, “तुमच्या घरीही…”
Bigg Boss 18 ekta Kapoor slams on Vivian dsena watch promo
Bigg Boss 18: एकता कपूरने ‘बिग बॉस’च्या लाडक्या विवियन डिसेनाला चांगलंच झापलं, म्हणाली, “तुला लाँच केल्यानंतर मी…”
bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
Deepika Padukone Ranveer Singh Reveals Baby Girl Name
दीपिका पादुकोण-रणवीर सिंह यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ठेवलं लाडक्या लेकीचं नाव; फोटो शेअर करत सांगितला अर्थ

हेही वाचा – Bigg Boss 18: दिवाळीच्या मुहूर्तावर ‘बिग बॉस’च्या घरात होणार मोठा धमाका! दोन दमदार वाइल्ड कार्डची होणार एन्ट्री

एकूण सात सदस्य नॉमिनेट केले गेले होते. अविनाश मिश्रा, ईशा सिंह, एलिस कौशिक, श्रुतिका अर्जुन, अरफीन खान, शिल्पा शिरोडकर आणि शहजादा या सदस्यांना बहुमताने नॉमिनेट केलं होतं. यापैकी शहजादा धामी घराबाहेर झाला आहे. तर शिल्पा शिरोडकरसह अविनाश मिश्रा, ईशा सिंह, एलिस कौशिक, श्रुतिका अर्जुन, अरफीन खान सुरक्षित झाले आहेत. याबाबतची माहिती ‘बिग बॉस तक’ या एक्स पेजवर देण्यात आली आहे.

हेही वाचा – Video: मायरा वायकुळच्या चिमुकल्या भावाचा दिवाळीचा पहिला दिवस ‘असा’ केला साजरा, पाहा व्हिडीओ

Bigg Boss 18
Bigg Boss 18

हेही वाचा – ठरलं! ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा घेणार निरोप, मिलिंद गवळी पोस्ट करत म्हणाले, “या प्रवासामध्ये…”

दरम्यान, ३१ ऑक्टोबरच्या भागात नवा ‘टाइम गॉड’ विवियन डिसेनाने रजत दलाल आणि श्रुतिकाला जेलमध्ये जेलमध्ये पाठवलं आहे. पण, ‘बिग बॉस’ने जेलमध्ये जाणाऱ्या सदस्यांच्या अधिकारात बदल केला आहे. याआधी जेलमध्ये असणाऱ्या दोन सदस्यांना रेशन वाटपाचा अधिकार देण्यात आला होता. पण, आता वेगळा अधिकार देण्यात आला आहे. रजत आणि श्रुतिकाला ‘बिग बॉस’ने दररोज घरात जेवणासाठी कोणते पदार्थ बनणार, हे ठरवण्याचा अधिकार दिला आहे.

Story img Loader