Bigg Boss 18: ‘बिग बॉस १८’च्या घरात सध्या नवनवीन ट्विस्ट येताना दिसत आहेत. नुकताच वीकेंड वारमध्ये एक बदल करण्यात आला. वीकेंड वार शनिवार, रविवार या दिवशी होतं होता. पण आता शुक्रवारपासून वीकेंड वार सुरू झाला आहे. शुक्रवार, शनिवार सलमान खान होस्टिंग करणार आहे. तर रविवारच्या होस्टिंगची जबाबदारी अभिनेता रवि किशनवर देण्यात आली आहे.

‘हाय-दईया विथ रवि भैय्या-गर्दा उडा देंगे’ असं रवि किशनच्या सेगमेंटचं नाव आहे. या सेगमेंटमधून रवि किशन सदस्यांची कानउघडणी करणार आहे. ३ नोव्हेंबरला झालेल्या ‘हाय-दईया विथ रवि भैय्या-गर्दा उडा देंगे’मध्ये रवि किशनने रजत दलाल, करणवीर मेहरा, चाहत पांडे, अरफीन खान, सारा अरफीन खान यांना अनोख्या अंदाजातून सुनावलं. पण, यावेळी चार जणांचा ग्रुप असलेल्या विवियन डिसेना, अभिषेक मिश्रा, ईशा सिंह आणि एलिश कौशिकला रवि किशन काहीही म्हणाला नाही. तसंच घरात फक्त विवियनच्या ग्रुपमध्ये नाती पाहायला मिळत आहे म्हणत रवि किशनने त्यांचं कौतुक केलं.

bigg boss marathi irina rudakova wishes happy bhaubeej to dhananjay powar
“Happy भाऊबीज भावा”, कोल्हापुरात धनंजय पोवारने केलेला पाहुणचार पाहून इरिना भारावली! म्हणाली, “नुसतं प्रेम…”
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
marathi actress vishakha subhedar dance with niece watch video
Video: “तुमचा वारसा ही पुढे चालवणार”, विशाखा सुभेदारचा भाचीबरोबरचा जबरदस्त डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…
Bigg Boss 18 alice kaushik gave death threat to karan veer Mehra
Bigg Boss 18: “मला करणवीरचा जीव घ्यायचा आहे”, एलिस कौशिकने दिली थेट धमकी, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

हेही वाचा – Video: “तुमचा वारसा ही पुढे चालवणार”, विशाखा सुभेदारचा भाचीबरोबरचा जबरदस्त डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…

रवि किशनच्या या सेगमेंटनंतर विवियन, अविनाश, ईशा, एलिस घराबाहेर एकत्र बसले होते. तेव्हा विवियनला आपल्या ग्रुपबरोबर काहीतरी बोलायचं होतं. पण, तितक्यात करणवीर तिथून जात होता. म्हणून विवियन म्हणाला, “आता काही बोलत नाही. नंतर बोलू.” त्यावेळी ईशा म्हणाली, “करणवीरचं नाव ‘जलनवीर’ ठेवायला पाहिजे.” तेच विवियन करणवीरला सांगतो. तो म्हणाला, “मी तुला एक नाव ठेवलं आहे.” करण म्हणतो, “बोलना.” विवियन म्हणाला, “जलनवीर मेहरा.” त्यानंतर विवियन अविनाश, ईशा, एलिसला मिठी मारतो आणि ग्रुपचं कौतुक केल्याचा आनंद व्यक्त करतो.

हेही वाचा – Bigg Boss 18: “मला करणवीरचा जीव घ्यायचा आहे”, एलिस कौशिकने दिली थेट धमकी, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकरने भाऊबीजनिमित्ताने धनंजय पोवारला दिलं हटके गिफ्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “वहिनीला…”

दरम्यान, दिवाळीच्या मुहूर्तावर दोन वाइल्ड कार्ड सदस्यांची जबरदस्त एन्ट्री झाली आहे. ‘स्प्लिट्सविला १५’मध्ये झळकलेले दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूर वाइल्ड कार्ड म्हणून ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभागी झाले आहेत.

Story img Loader