Bigg Boss 19 Ticket To Finale Task : लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ आता त्याच्या अंतिम टप्प्यावर आला आहे. येत्या ७ डिसेंबर रोजी शोचा ग्रँड फिनाले होणार आहे आणि त्याआधी अंतिम फेरीत जाण्यासाठी स्पर्धकांमध्ये ‘तिकीट टू फिनाले’ हा टास्क पार पडणार आहे. त्यामध्ये आठ सदस्यांपैकी चार सदस्यांनी ‘तिकीट टू फिनाले’ जिंकत फिनालेमध्ये जाण्याची बाजी मारली आहे. कोण आहेत हे चार स्पर्धक? कसा रंगला ‘तिकीट टू फिनाले’ टास्क? चला जाणून घेऊ…
‘बिग बॉस’ ‘तिकीट टू फिनाले’साठी सर्व स्पर्धकांना असेंब्ली रूममध्ये बोलावतात. त्यावेळी ‘बिग बॉस’ इतर स्पर्धकांना वाइल्ड-कार्ड स्पर्धक मालती आणि शहबाज यांना या टास्कमध्ये समाविष्ट करू इच्छितात का? असे विचारतात. त्यावर घरातले स्पर्धक त्यांची त्यांची मतं व्यक्त करतात.
‘असा’ होणार ‘टिकट -टु-फिनाले’चा टास्क
‘बिग बॉस’च्या घरात गार्डन एरियामध्ये ‘तिकीट टू फिनाले’ टास्कसाठीचा एक सेटअप तयार केला जाणार आणि ज्यात दोन ट्रॅक तयार केले जातील. स्पर्धकांमध्ये एक शर्यत होईल. त्यात प्रत्येकाला ही शर्यत जिंकून ट्रॅक पार करावा लागणार आहे, ज्यामुळे ते ‘तिकीट टू फिनाले’साठी पात्र ठरतील. प्रत्येक वेळी दोनच स्पर्धक या शर्यतीत भाग घेऊ शकणार आहेत आणि बाकीचे दोन सह-स्पर्धक त्यांना मदत करतील. या टास्कमध्ये एकूण चार शर्यती होतील,ज्यामध्ये चार स्पर्धकांना ‘तिकीट टू फिनाले’ मिळेल आणि उर्वरित चार जण या स्पर्धेतून बाहेर पडतील.
‘या’ स्पर्धकांना मिळणार टिकट -टु-फिनाले’
या टास्कमध्ये स्पर्धकांना बॅगमध्ये चारा भरावा लागणार आहे. त्यांना १० मिनिटांत हे काम पूर्ण करायचं आहे. मग त्यांना बॅग उचलून त्याचं वजन मोजायचं आहे. ज्या बॅगचं वजन जास्त असेल, साहजिकच ती व्यक्ती या टास्कमध्ये पुढे जाईल. ‘फिल्म विंडो’नुसार, पहिल्या राउंडमध्ये अशनूर कौरनं ‘तिकीट टू फिनाले’ जिंकत महाअंतिम फेरीत जाण्यासाठीची पहिली दावेदारी मिळवली. त्यात तिची सहस्पर्धक होती, तान्या मित्तल. या टास्कमध्ये गौरवने अशनूरला मदत केली; तर तान्याच्या मदतीला प्रणित होता.
दुसऱ्या राउंडमध्ये प्रणित मोरे आणि शहबाज यांच्यात टास्क झाला. प्रणितला गौरवने मदत केली आणि शहबाजला अशनूरने. त्यात प्रणितनं अंतिम फेरीत जाण्याचं तिकीट जिंकलं आणि शहबाज एलिमिनेट झाला. मग तिसऱ्या राउंडमध्ये गौरव खन्ना आणि मालती चाहर यांच्यात टास्क झाला. यावेळी अशनूरनं गौरवला आणि शहबाजनं मालतीला मदत केली. त्यामध्ये गौरवनं मालतीला पराभूत करून ‘तिकीट टू फिनाले’ जिंकलं.
मग शेवटच्या चौथ्या राउंडमध्ये फरहाना आणि अमाल यांच्यात टास्क झाला. यावेळी शहबाजनं अमालला आणि गौरवनं फरहानाला मदत केली. या फेरीत फरहाना ‘तिकीट टू फिनाले’ जिंकत अंतिम फेरीत पोहोचली. या टास्कमध्ये अमाल, तान्या, मालती व शहबाज यांना पराभव स्वीकारावा लागला.
