Bigg Boss 20 Full and Final List of contestants : ‘बिग बॉस’च्या २० व्या सीझनचा ग्रँड प्रीमियर सोहळा नुकताच दणक्यात पार पडला आहे. यंदा शोमध्ये एकूण १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. आता या सोळा जणांमध्ये कोण बाजी मारणार, घरातील खेळ कसा रंगणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘बिग बॉस’च्या २० व्या सीझनमध्ये यंदा प्रेक्षकांना अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळतील. गेल्या १९ वर्षांत पहिल्यांदाच, डिझायनर उमंग कुमार यांनी ‘बिग बॉस’चं घर उभारण्याची जबाबदारी वर्षा जैन यांच्याकडे सोपवली होती. १०,००० चौरस फूट जागेत पसरलेल्या या घरात १०४ कॅमेरे असतील. ‘बिग बॉस’ सीझन २० ‘कलर्स टीव्ही’वर प्रसारित होईल आणि ‘जिओ-हॉटस्टार’ (JioHotstar) वर स्ट्रीम केला जाईल. याशिवाय स्पर्धकांना यावर्षी २ लाइफलाइन्स ( एलिमिनेट झाल्यावरही दुसरी संधी ) मिळणार आहेत.

यंदाच्या १६ स्पर्धकांची नावं आहेत, वाचा संपूर्ण यादी…

  1. कनिका मान
  2. आसिफ खान
  3. काझी तौकीर
  4. ईशा रिखी
  5. आम्रपाली दुबे
  6. रोहेद खान
  7. लव्ह गिल
  8. मेरी कोम
  9. YUNG DSA
  10. ScoutOP
  11. अरिश्फा खान
  12. गुल्लू ( कुशल तन्वर)
  13. अमन गांधी
  14. उदिती सिंग
  15. रिती तिवारी
  16. माही विज

Live Updates

Bigg Boss 20 Grand Premiere Updates, Full List of Contestants

22:45 (IST) 6 Sep 2026
Bigg Boss 20 Mahhi Vij : घरात एन्ट्री घेणारी १६ वी आणि अखेरची सदस्य आहे...

Bigg Boss 20 Mahhi Vij : घरात एन्ट्री घेणारी अखेरची स्पर्धक आहे, हिंदी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री माही विज. तिने गेली अनेक वर्षे हा शो नाकारला होता. याशिवाय दीड महिन्यांपूर्वी देखील तिने शोसाठी नकार दिला होता. पण, मुलांनी सांगितल्यामुळे तिने शेवटी घरात एन्ट्री घेण्याचा निर्णय घेतला. तिची लेक तारा अवघ्या ७ वर्षांची आहे.

22:37 (IST) 6 Sep 2026

Bigg Boss 20 Live Contestant No. 15th : मनोज तिवारींच्या लेकीची बिग बॉसच्या घरात एन्ट्री...

Bigg Boss 20 Live Contestant No. 15th : भोजपुरी सुपरस्टार आणि भाजपा खासदार मनोज तिवारींच्या लेकीची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री झाली आहे.

https://www.instagram.com/reel/Dc9BmP6qJFt/?utm_source=ig_web_copy_link&stkn=MzRlODBiNWFlZA==

22:33 (IST) 6 Sep 2026
Bigg Boss 20 Live Updates : घरात एन्ट्री घेणारी १४ वी स्पर्धक आहे उदिती सिंग.

अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये सक्रिय असलेली लोकप्रिय अभिनेत्री उदिती सिंगने घरात एन्ट्री घेतली आहे. काही वर्षांपूर्वी करण वाही आणि उदितीच्या डेटिंगची बरीच चर्चा झाली होती. तीन वर्षे डेट केल्यावर या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.

https://www.instagram.com/reel/Dc9Ay8dK5v-/?utm_source=ig_web_copy_link&stkn=MzRlODBiNWFlZA==

22:29 (IST) 6 Sep 2026

Bigg Boss 20 Live Updates : घरात एन्ट्री घेणारा १३ वा स्पर्धक आहे...

Bigg Boss 20 Live Updates 13th Contestant : 'नागिन ३', 'भाग्य लक्ष्मी' आणि 'क्योंकी सास भी कभी बहू थी २' यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेला लोकप्रिय अभिनेता अमन गांधीने घरात एन्ट्री घेतली आहे.

https://www.instagram.com/reel/Dc9AK5pKq4n/?utm_source=ig_web_copy_link&stkn=MzRlODBiNWFlZA==

22:25 (IST) 6 Sep 2026

Bigg Boss 20 LIVE Updates : 'रोडीज', 'Splitsvilla' या शोचा विजेता गुल्लू 'बिग बॉस'चं घर गाजवणार!

Bigg Boss 20 : बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणारा १२ वा स्पर्धक आहे रोडीज', 'Splitsvilla' या शोचा विजेता गुल्लू (उर्फ कुशल तन्वर)

https://www.instagram.com/reel/Dc9ALr6sASR/?utm_source=ig_web_copy_link&stkn=MzRlODBiNWFlZA==

22:21 (IST) 6 Sep 2026

Bigg Boss 20 Arishfa Khan : २३ वर्षांच्या अरिश्फाची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणारी ११ वी स्पर्धक आहे अरिश्फा खान. ती २३ वर्षांची असून, तिचे इन्स्टाग्रामवर २९ मिलियन फॉलोअर्स आहेत.

https://www.instagram.com/reel/Dc8_rdkKzJ8/?utm_source=ig_web_copy_link&stkn=MzRlODBiNWFlZA==

22:18 (IST) 6 Sep 2026

Bigg Boss 20 Live : घरात एन्ट्री घेणाऱ्या १० व्या स्पर्धकाचं नाव आहे...

Bigg Boss 20 Live Updates 10th Contestant : प्रसिद्ध गेमर स्काउट ओपी (ScoutOP) म्हणजेच तन्मय सिंगने 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतली आहे.

https://www.instagram.com/reel/Dc8_O8mqmsc/?utm_source=ig_web_copy_link&stkn=MzRlODBiNWFlZA==

22:10 (IST) 6 Sep 2026
Bigg Boss 20 Live Updates 9th Contestant : २२ वर्षीय स्पर्धकाची बिग बॉसच्या घरात एन्ट्री...

Bigg Boss 20 Live Updates 9th Contestant : २२ वर्षीय रॅपर YUNG DSA ( हर्ष माछरे ) ची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

हा मराठमोळा हर्ष मूळचा पुण्याचा आहे...

https://www.instagram.com/reel/Dc891AZKJxz/?utm_source=ig_web_copy_link&stkn=MzRlODBiNWFlZA==

21:57 (IST) 6 Sep 2026

Bigg Boss 20 Updates 7th Contestant : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणी एन्ट्री घेतली रिया अहिर की लव्ह गिल?

Bigg Boss 20 Updates : 'फॅन्स का फैसला'साठी रिया अहिर आणि लव्ह गिल या दोघी दावेदार होत्या. यापैकी सर्वाधिक मतं मिळवून लव्ह गिल शोमध्ये सहभागी झाली आहे.

21:45 (IST) 6 Sep 2026

Bigg Boss 20 Updates 5th Contestant : बिग बॉसची पाचवी स्पर्धक आहे 'ही' भोजपुरी अभिनेत्री

Bigg Boss 20 Updates 5th Contestant : 'बिग बॉस २०'ची पाचवी स्पर्धक आहे भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे.

https://www.instagram.com/reel/Dc87dX4qf66/?utm_source=ig_web_copy_link&stkn=MzRlODBiNWFlZA==

21:39 (IST) 6 Sep 2026

Bigg Boss 20 : ५ महिन्यांत घटस्फोट, आता बादशहाच्या एक्स पत्नीची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि त्याची दुसरी पत्नी अभिनेत्री ईशा रिखी यांचा अवघ्या ५ महिन्यांचा संसार नुकताच मोडला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, त्यावर आता घटस्फोटाची अधिकृत घोषणा करत दोघांनीही शिक्कामोर्तब केलं आहे. आता ईशाने 'बिग बॉस २०'च्या घरात एन्ट्री घेतली आहे. भूतकाळ विसरून नवीन सुरुवात करायची असल्याचं ती सलमानशी संवाद साधताना म्हणाली.

https://www.instagram.com/reel/Dc86buQK2Tr/?utm_source=ig_web_copy_link

21:32 (IST) 6 Sep 2026

Bigg Boss 20 : यावर्षीचा तिसरा स्पर्धक आहे गायक Qazi Touqeer

Bigg Boss 20 Qazi Touqeer : यावर्षीचा तिसरा स्पर्धक आहे गायक काझी तौकीर, याने 'अफगान जलेबी'सारखी गाणी गायली आहेत

https://www.instagram.com/reel/Dc85tVnqQIw/?utm_source=ig_web_copy_link&stkn=MzRlODBiNWFlZA==

21:26 (IST) 6 Sep 2026

Bigg Boss 20 LIVE Second Contestant : आसिफ खान 'बिग बॉस २०'मध्ये प्रवेश घेणारा दुसरा स्पर्धक

Bigg Boss 20 Second Contestant : राजस्थानच्या आसिफ खानने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. त्याचा जन्म १९९१ मध्ये राजस्थानच्या निंबाहेरा येथे झाला. यापूर्वी आसिफ 'पंचायत' आणि 'मिर्झापूर' सारख्या सीरिजमध्ये झळकला आहे.

https://www.instagram.com/reel/Dc845Z2K-my/?utm_source=ig_web_copy_link&stkn=MzRlODBiNWFlZA==

21:11 (IST) 6 Sep 2026
Bigg Boss 20 LIVE First Contestant : यंदाची पहिली स्पर्धक आहे...; सलमान खानची आई आहे तिची फॅन

Bigg Boss 20 LIVE First Contestant : यंदाची पहिली स्पर्धक कनिका मान आहे. ती हिंदी मालिकाविश्वातील 'नागीण' फेम प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती मंचावर येताच सलमान खानने तिला माझी आई तुझी फॅन असल्याचं सांगितलं.

https://www.instagram.com/reel/Dc84G3rKjcP/?utm_source=ig_web_copy_link

21:05 (IST) 6 Sep 2026
Bigg Boss 20 - यंदा स्पर्धकांना मिळणार दोन जीवनदान

Bigg Boss 20 Salman Khan - यंदाच्या सीझनमध्ये एलिमिनेट होणाऱ्या स्पर्धकांना दोन जीवनदान मिळणार आहेत. म्हणजेच दुसरी संधी देखील मिळेल.

20:14 (IST) 6 Sep 2026

Bigg Boss 20 : अभिनेत्री माही विजच्या परफॉर्मन्सची पहिली झलक

Bigg Boss 20 Mahhi Vij : 'लागी तुझसे लगन' आणि 'बालिका वधू' यांसारख्या मालिकांमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री माही विज यंदा बिग बॉसच्या २० व्या सीझनमध्ये एन्ट्री घेणार आहे.

https://www.instagram.com/reel/Dc8Pq4AKsHi/?utm_source=ig_web_copy_link&stkn=MzRlODBiNWFlZA==

20:12 (IST) 6 Sep 2026

Bigg Boss 20 : मनोज तिवारी यांची मुलगी रिथी तिवारी 'बिग बॉस २०' मध्ये सहभागी होणार

Bigg Boss 20 - मनोज तिवारी यांची मुलगी रिथी तिवारी स्पर्धक म्हणून 'बिग बॉस २०' मध्ये प्रवेश करण्यास सज्ज झाली आहे.

https://www.instagram.com/reel/Dc6feI9sBwl/?utm_source=ig_web_copy_link&stkn=MzRlODBiNWFlZA==

19:27 (IST) 6 Sep 2026

Bigg Boss 20 : सलमान खानचा डान्स परफॉर्मन्स

Salman Khan Bigg Boss 20 Dance Performance : 'बिग बॉस २०' च्या मंचावर सलमान खान त्याच्या सदाबहार गाण्यांवर खास डान्स परफॉर्मन्स सादर करणार आहे.

https://www.instagram.com/reel/Dc6cVxnK5UD/?utm_source=ig_web_copy_link&stkn=MzRlODBiNWFlZA==

19:24 (IST) 6 Sep 2026
Bigg Boss 20 theme : नव्या पर्वाची संकल्पना

Bigg Boss 20 - या सीझनची मुख्य संकल्पना आहे Tathastu ( तथास्तु / 'तथास-टू' ), यंदाच्या पर्वात एलिमिनेट झालेल्या स्पर्धकांना दुसरी संधी मिळेल असं बोललं जात आहे. याचा ग्रँड प्रीमियर सोहळ्यात उलगडा होईल.

19:22 (IST) 6 Sep 2026

Bigg Boss 20 premiere: सलमान खानचा शो कधी आणि कुठे पाहाल?

Bigg Boss 20 Live : सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस हिंदीच्या २० व्या सीझनचा ग्रँड प्रीमियर सोहळा प्रेक्षक 'जिओ-हॉटस्टार'वर (JioHotstar) रात्री ९ वाजता आणि त्यानंतर 'कलर्स टीव्ही'वर रात्री १०:३० वाजता पाहू शकतात.

bigg boss 20 updates Contestants List Colors TV JioHotstar

Bigg Boss 20 Full List of Contestants : 'बिग बॉस' हिंदीच्या २० व्या पर्वाला आजपासून ( ६ सप्टेंबर ) सुरूवात झाली आहे. यंदा घरात एकूण १६ स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'बिग बॉसच्या २०'व्या सीझनबद्दलच्या सगळ्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर...