‘बिग बॉस १६’ फेम व ताजिकिस्तानी गायक अब्दु रोजिकनं नुकतीच त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. दोन दिवसांपूर्वी २० वर्षीय अब्दुनं अंगठी दाखवीत त्याच्या लग्नाची घोषणा केली. याबाबत त्यानं त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता आणि तो तुफान व्हायरल झाला होता. त्यात अब्दुनं त्याच्या लग्नाची तारीखदेखील जाहीर केली होती. अशातच अब्दुनं आता पहिल्यांदाच त्याच्या वाग्दत्त पत्नीबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अब्दुने शुक्रवारी (११ एप्रिल रोजी) त्याच्या सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देत त्यानं लिहिलं, “अलहमदुलिल्लाह, २४/०४/२०२४” पहिल्या फोटोत अब्दु त्याच्या पारंपरिक पोशाखात दिसत आहे आणि त्याच्या हातात अंगठी दिसतेय. त्याची होणारी पत्नी अमीरा त्याच्या शेजारी बसली आहे. अमीरानं सफेद रंगाचा पोशाख परिधान केला होता. दुसऱ्या फोटोत अब्दु त्याच्या पत्नीला अंगठी घालताना दिसतोय. शारजाह, यूएई (Sharjah, UAE)मध्ये दोघांचा साखरपुडा पार पडला.

हेही वाचा… गुड न्यूज दिल्यानंतर पहिल्यांदाच दिसला दीपिका पदुकोणचा बेबी बंप; अभिनेत्रीचा अनसीन फोटो व्हायरल

अब्दुच्या या पोस्टवर चाहत्यांबरोबरच कलाकारांनीदेखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एली अवराम हिनं कमेंट करीत लिहिलं, अभिनंदन! ए. आर. रहमान यांची मुलगी खतिजा रहमान म्हणाली, “मुबारक, प्रिय अब्दु.”

अब्दुनं याआधी’ ई टाइम्स टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या पत्नीबद्दल भाष्य केलं होतं. अब्दु म्हणाला होता, “जीवनाच्या अनिश्चिततेदरम्यान अमीरा माझ्या आयुष्यात येणं हा एक विलक्षण आशीर्वाद आहे. आता माझं हृदय कृतज्ञतेनं ओसंडून वाहतं आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण आता मला उत्साहपूर्ण वाटत आहे. अमीरामुळे जणू मला जगण्याचा अर्थच कळला आहे.

हेही वाचा… ठरलं तर मग: “सरांच्या मनात माझ्याविषयी प्रेम…”, अर्जुनच्या प्रेमात पडलेली सायली होणार कुसुमसमोर व्यक्त; प्रोमो पाहून चाहते म्हणाले, “फालतूगिरी…”

“अल्लाहनं मला विलक्षण जीवनसाथी दिल्याच्या जाणिवेनं मी खूप समाधानी आहे. अमीराच्या असण्यानं माझं आयुष्य अगदी फुलून गेलं आहे. तिनं माझ्या आयुष्यात आणलेल्या या आनंदाबद्दल मी अनंत ऋणी आहे. ती फक्त माझी सोबती नाही; तर ती प्रेम, सामर्थ्य व शांतता यांचं मूर्त स्वरूप आहे. ती माझ्याबरोबर असल्यानं मला माझ्या आयुष्याचा अर्थ कळला आहे,” असंही अब्दु म्हणाला होता.

अब्दुचे कधी होणार लग्न?

‘खलीज टाइम्स’च्या वृत्तानुसार, अब्दु शारजाहमधील एक अमिराती मुलगी १९ वर्षीय अमीराबरोबर लग्न करणार आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये अब्दु तिला दुबईच्या एका मॉलमध्ये भेटला होता. हे लग्न ७ जुलै रोजी यूएईमध्ये पार पडणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss fame abdu rozik shared his engagement photos with fiancee ameera dvr