‘बिग बॉस १६’फेम अब्दु रोजिक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. २० वर्षीय अब्दुने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर करत ही गुड न्यूज चाहत्यांना दिली. लगेच दुसऱ्या दिवशी अब्दुने १९ वर्षीय अमीराशी यूएईमध्ये साखरपुडादेखील उरकला. अमीरा आणि त्याचे फोटो अब्दुने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अब्दु-अमीराच्या साखरपुड्याचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. फोटो व्हायरल होताच अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आणि अनेकांनी अब्दुला ट्रोलदेखील केलं. अब्दुच्या या आनंदावर विरझण घतल्यासारखं झाल्यामुळे त्याने सगळ्या ट्रोलर्सला विनंती करत एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात तो म्हणाला की, माझं लग्न अनेकांना खोटं वाटतंय पण ते खरं आहे. माझी उंची लहान आहे म्हणून माझं लग्न होऊ शकत नाही असं लोकांना वाटतंय. अशाप्रकारचा एक व्हिडीओ अब्दुने सोशल मीडियावर शेअर करून ट्रोलर्सची बोलती बंद केलीय.

Akshay Kumar said he is uneducated but praised wife Twinkle Khanna for her intelligence
“मी अशिक्षित माणूस…”, अक्षय कुमारला अभ्यासाची कधीच नव्हती आवड; म्हणाला, “माझ्या मुलीला ट्विंकलकडून…”
Hruta Durgule wishes wedding anniversary to husband Prateek Shah by sharing post on social media
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हृता दुर्गुळेने शेअर केली पती प्रतीकसाठी खास पोस्ट; म्हणाली, “तू जसा…”
bigg boss fame abdu rozik got trolled on engagement photos due to his height
VIDEO: “माझी उंची लहान…”, १९ वर्षीय अमीराशी लग्नाचा घाट घातलेल्या अब्दु रोजिकला केलं जातंय ट्रोल, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
Kareena kapoor saif kissed in front of paparazzi video viral
VIDEO: करीना कपूर आणि सैफने केलं पापाराझींसमोर किस, व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी म्हणाले, “घरात यांना…”
Tharla tar mag promo arjun slaps chaitanya for telling sakshi about contract marriage
ठरलं तर मग: …अन् अर्जुन चैतन्यच्या कानाखाली मारतो, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य साक्षीला सांगितल्यामुळे अर्जुनचा राग अनावर, पाहा प्रोमो
Tharala tar mag promo Chaitanya told sakshi about arjun and sayali contract marriage
ठरलं तर मग: अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य आलं साक्षीसमोर; चैतन्य खुलासा करत म्हणाला “ते खरे नवरा बायको…”
Aishwarya Narkar adah dance video in saree went viral on social media
ऐश्वर्या नारकर यांचा साडीतला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत; चाहते म्हणाले, “अदा, तुमच्यावर सारे फिदा…”
Aayush Sharma on Arpita Khan skin color and weight being trolled
पत्नी अर्पिता खानला केलं जातं अजूनही ट्रोल; आयुष शर्मा म्हणाला, “लोकं तिच्या रंगाची चेष्टा…”

हेही वाचा… राखी सावंत रुग्णालयात दाखल; ह्रदयाशी संबंधित आजारामुळे बिघडली प्रकृती; फोटो व्हायरल

अब्दु लवकरच सुरू होणाऱ्या त्याच्या नवीन आयुष्यासाठी खूपच उत्साही दिसत आहे. लवकरच अब्दुचं लग्न पार पडणार असून तो लग्नाच्या तयारीलादेखील लागला आहे. अब्दु रोजिकने त्याच्या सोशल मीडियावर मंगळवारी एक फोटो शेअर केला. यामध्ये अब्दुने त्याच्या हाताला आणि चेहेऱ्याला फेस पॅक लावल्याचं दिसून येतंय. या फोटोला कॅप्शन देत “शादी रेडी” असं अब्दुने लिहिलं. अब्दुचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

अब्दुनं याआधी ’ई टाइम्स टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या होणाऱ्या पत्नीबद्दल भाष्य केलं होतं. अब्दु म्हणाला होता, “जीवनाच्या अनिश्चिततेदरम्यान अमीरा माझ्या आयुष्यात येणं हा एक विलक्षण आशीर्वाद आहे. आता माझं हृदय कृतज्ञतेनं ओसंडून वाहतं आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण आता मला उत्साहपूर्ण वाटत आहे. अमीरामुळे जणू मला जगण्याचा अर्थच कळला आहे.”

हेही वाचा… VIDEO: “माझी उंची लहान…”, १९ वर्षीय अमीराशी लग्नाचा घाट घातलेल्या अब्दू रोजिकला केलं जातंय ट्रोल, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

दरम्यान, अब्दु रोजिकने काही दिवसांपूर्वी त्याच्या लग्नाची बातमी दिली आणि त्यानंतर लगेचच साखरपुडा उरकला. ‘खलीज टाइम्स’च्या वृत्तानुसार, अब्दु शारजाहमधील एक अमिराती मुलगी १९ वर्षीय अमीराबरोबर लग्न करणार आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये अब्दु तिला दुबईच्या एका मॉलमध्ये भेटला होता. हे लग्न ७ जुलै रोजी यूएईमध्ये पार पडणार आहे.