काँग्रेसच्या हस्तिनापूरच्या जागेवरच्या २०२२ची विधानसभा निवडणूक लढवलेल्या अभिनेत्री अर्चना गौतमवर तीन महिन्यांपूर्वीच पक्षाने मोठी कारवाई केल्याचं समोर आलं आहे. अर्चनाची काँग्रेसमधून हक्कालपट्टी झाली असून सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. यासंबंधिची नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. शिवाय मेरठ जिल्हा काँग्रेस कमिटीनं एसएसपी मेरठ यांना अर्चना आणि तिच्या वडिलांवर अनेक गंभीर आरोप करत कारवाईसाठीचे पत्र देखील दिले आहे.

हेही वाचा – शाहरुख खानच्या ‘जवान’ने अखेर ‘पठाण’चा मोडला वर्ल्डवाइड रेकॉर्ड; देशांतर्गत २४व्या दिवशी केली जबरदस्त कमाई

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

शुक्रवारी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर झालेल्या वादानंतर अर्चनाला पक्षातून अगोदरच निलंबित केल्याची नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्या नोटीसनुसार, प्रदेश काँग्रेसने अर्चनाला अनेक गंभीर आरोपासंबंधीत ३१ मे रोजी नोटीस बजावली होती. या नोटीसला एका आठवड्याच्या आत उत्तर देण्यासाठी सांगितलं होतं. परंतु अजूनपर्यंत अर्चनाने त्या नोटीसला उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे काँग्रेस शिस्तपालन समितीने अर्चानाला सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे. ८ जूनला अर्चनाला ही निलंबित करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

हेही वाचा – Video: ‘दार उघड बये’ ७ ऑक्टोबरला प्रेक्षकांचा घेणार निरोप; शूटिंगच्या शेवटच्या दिवसातील काही खास क्षण पाहा

दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर झालेल्या वादानंतर तिची पक्षातून हक्कालपट्टी झाल्याचं म्हटलं जात आहे. पण तसं नसून तिला पक्षातून निलंबित झाल्याची नोटीस तीन महिन्यांपूर्वीची जारी केली होती. प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते मनीष हिंदवी म्हणाले की, “अर्चना गौतम यांना पक्षविरोधी कारवायांमुळे नोटीस दिल्यानंतर त्यांची जूनमध्ये हकालपट्टी करण्यात आली होती.”

हेही वाचा – Video: लहान मुलगा बोबड्या बोलात म्हणाला ‘ऐश्वल्या लाय’, अभिनेत्रीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल

शुक्रवारी झालेल्या घटनेबाबत अर्चना गौतम काय म्हणाली होती?

“मी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जात होते. मात्र मला अडवण्यात आलं. त्यानंतर मला धक्काबुक्की करण्यात आली. तसंच शिवीगाळ करुन कार्यालयाबाहेर पिटाळून लावण्यात आलं. माझ्या वडिलांनी मला सावरलं आणि कारमध्ये बसवून निघून गेले. मात्र आता मी शांत बसणार नाही. माझ्यासारख्या अभिनेत्रीशी काँग्रेस पक्ष असा वागत असेल तर इतरांचं काय? मी गप्प बसणार नाही. यापुढची लढाई सुरुच ठेवणार. माझ्याबाबत जो प्रकार झाला तो धक्कादायक होता आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचं वर्तन चुकीचं होतं,” असं अर्चना गौतमने म्हटलं आहे.

Story img Loader