Actress Sreejita De- Michael Blohm-Pape Wedding : लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १६’ची स्पर्धक श्रीजिता डे सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. श्रीजिता पुन्हा एकदा लग्न करत आहे. तिच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सध्या ती तिच्या लग्नाच्या तयारीत व्यग्र आहे.

श्रीजिता डेने तिचा बॉयफ्रेंड मायकल ब्लोम-पेपशी ३० जून २०२३ ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर आठ महिन्यांनी तिने लग्नाचं रिसेप्शन दिलं होतं. आता ती पुन्हा एकदा लग्न करतेय. श्रीजिता पती मायकलशीच बंगाली पद्धतीने पुन्हा लग्नगाठ बांधणार आहे. तिच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे, त्यातील तारखेनुसार ती रविवारी (१० नोव्हेंबर रोजी) लग्न करणार आहे.

tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
Drashti Dhami First Photo with Newborn Daughter
लग्नानंतर ९ वर्षांनी आई झाली प्रसिद्ध अभिनेत्री, पहिल्यांदाच शेअर केला गोंडस लेकीचा फोटो
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Hemansh Kohli to get married
बॉलीवूड अभिनेता ३५ व्या वर्षी करणार अरेंज मॅरेज, मंदिरात बांधणार लग्नगाठ

हेही वाचा – ९ वर्षांचा संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यावर गायिकेने मुंबईत घेतलं घर, फोटो केले शेअर

पाहा पत्रिकेचा फोटो –

sreejita de and michael bengali wedding 1
श्रीजिता व मायकल यांच्या लग्नाची पत्रिका (फोटो – इन्स्टाग्राम)

श्रीजिता व मायकल यांचा मेहंदी सोहळा व संगीताचा कार्यक्रम शनिवारी ९ नोव्हेंबर रोजी होईल. त्यानंतर रविवारी (१० नोव्हेंबरला) हळदी, ४ वाजता लग्न आणि त्याच दिवशी रात्री ८ वाजता त्यांचे रिसेप्शन असेल. श्रिजीताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पत्रिकेचे फोटो शेअर केले होते.

हेही वाचा – बॉलीवूड अभिनेता ३५ व्या वर्षी करणार अरेंज मॅरेज, मंदिरात बांधणार लग्नगाठ

पाहा पत्रिकेचा फोटो –

sreejita de and michael bengali wedding
श्रीजिता व मायकल यांच्या लग्नाची पत्रिका (फोटो – इन्स्टाग्राम)

श्रीजिता व मायकल २०१९ पासून एकमेकांना डेट करत होते. दोघांची पहिली भेट एका रेस्टॉरंटमध्ये झाली होती. त्यानंतर ते प्रेमात पडले होते. मायकलने श्रीजिताला पॅरिसमध्ये प्रपोज केलं होतं. करोनामुळे त्यांनी लग्न पुढे ढकललं होतं. अखेर २०२३ च्या जून महिन्यात त्यांनी जर्मनीत ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. आता हे दोघेही बंगाली पद्धतीने लग्न करणार आहेत.

Story img Loader