‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व सुरू होण्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत. उद्या, २१ जूनपासून ‘बिग ओटीटी’चं तिसरं पर्व सुरू होतं आहे. हे पर्व थोडं खास आहे. कारण अभिनेते अनिल कपूर होस्ट करणार आहेत. त्यामुळे सर्वांनाच ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाची उत्सुकता लागली आहे. पण असं असलं तरी ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाची क्रेझ अजूनही चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. या पर्वातील स्पर्धेक कायम चर्चेत असतात. त्याचे फोटो, व्हिडीओ सतत व्हायरल होतं असतात. या पर्वात झळकलेल्या आयशा खानला मराठी भाषेची चांगलीच भुरळ पडली आहे. काही दिवसांपासून तिनं मराठी गाण्यावर रील केली होती. त्यानंतर आता अमराठी असलेली आयशा चक्क मराठी बोलताना पाहायला मिळाली.

‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वामुळे घराघरात पोहोचलेली आयशा खानने काही तासांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. “जेवलास का?” असं कॅप्शन तिनं या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओत ती मराठीत बोलताना दिसत आहे. आयशा म्हणतेय, “कसं काय?…हम्मम….जेवलीस का?…का?…तुला किती वेळा सांगितलंय, जेवण करायचं ना टाइमवर…जा जेवून ये.” आयशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तसंच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

हेही वाचा – Video: “कोण म्हणेल का मराठी गायक आहे म्हणून”, रोहित राऊतने पहिल्यांदाच गायलेलं तमिळ गाणं ऐकून चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस

आयशाने या व्हिडीओच्या कमेंट पुरणपोळी आवडत असल्याचं म्हटलं आहे. तसंच “महाराष्ट्राकडून प्रेम”, “किती गोड”, “छान दिसतेस”, “तू जेवलीस का?”, “मराठीत किती गोड बोलतेस”, “मराठी मुलगी”, “तुझा हा व्हिडीओ आम्ही पुन्हा पुन्हा बघतोय”, “लय भारी”, “मला तू खूप आवडते”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: ‘देखा तेनु पहली पहली बार…”, नारकर जोडप्याचा रोमँटिक गाण्यावर जबरदस्त डान्स, अविनाश यांच्या एक्सप्रेशन्सने वेधलं लक्ष

दरम्यान, आयशा खानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिचं काही महिन्यांपूर्वी ‘खाली बोतल’ नावाचं गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्यात अभिषेक कुमार व आयशाची जबरदस्त केमेस्ट्री पाहायला मिळाली होती. ‘खाली पोतल’ या गाण्याला २ महिने पूर्ण झाले असून आतापर्यंत युट्यूबवर ८ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.