Bigg Boss Fame Gaurav Khanna Networth : गौरव खन्ना हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. आजवर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या तो ‘बिग बॉस १९’मुळे चर्चेत आहे. यामुळे तो सतत कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. गौरव हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का त्याची नेटवर्थ किती आहे?
‘बिग बॉस १९’मध्ये सहभागी असलेल्या गौरवने मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो आणि त्याचा तिथे मोठा चाहतावर्ग आहे. शेवटचं त्याने ‘स्टार प्लस’वरील ‘अनुपमा’ मालिकेत काम केलं होतं. यातील त्याच्या अनुज या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला. परंतु तुम्हाला माहीत आहे का, अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्याने मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केलं होतं आणि तो आज टेलिव्हिजनवरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
गौरव खन्नाची नेटवर्थ किती?
‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार गौरव खन्नाची नेटवर्थ ही जवळपास कोट्यवधींमध्ये आहे. गौरवची एकूण नेटवर्थ जवळपास ८ कोटी ते १५ कोटींपर्यंत आहे. त्याचे उत्पादनाचे विविध सोर्स आहेत. तो मालिकांमधून, रिअॅलिटी शोमधून, जाहिरातींमधून आणि सोशल मीडिया कोलॅममधूनही पैसे कमावतो. महत्त्वाचं म्हणजे ‘बिग बॉस १९’मधील तो सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकांपैकी एक आहे. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार तो दर आठवड्याला १७.५ लाख आणि दर एपिसोडमागे २.५ लाख इतकं मानधन घेतो.
गौरवने ‘बिग बॉस’मध्ये सहभाग घेण्यापूर्वी ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्येही सहभाग घेतला होता. त्यावेळी त्याने एका एपिसोडसाठी २.५ लाख इतकं मानधन घेतलं होतं. महत्त्वाचं म्हणजे गौरव ‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’च्या या पर्वाचा विजेता ठरला होता. गौरवकडे याव्यतिरिक्त मुंबईत आलिशान अपार्टमेंट आहे. त्याच्याकडे महागड्या गाड्यादेखील आहेत. गौरवकडे ऑडी, रॉयल इन्फिल्ड या गाड्या आहेत.
दरम्यान, गौरव सध्या ‘बिग बॉस १९’ मुळे चर्चेत असून तो या कार्यक्रमात वेगवेगळ्या स्ट्रॅटजी प्लॅन करत गेम खेळत असतो. गौरव या पर्वातील लोकप्रिय आणि चर्चेत असणाऱ्या स्पर्धकांपैकी एक आहे. त्याने ‘बिग बॉस १९’चा खिताब जिंकावा अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.
