scorecardresearch

Video: हाताने डोसा खाल्ल्याने शिव ठाकरेवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले “तू एकदम…”

शिव ठाकरेचा डोसा खातानाचा व्हिडीओ व्हायरल

shiv thakare video
शिव ठाकरेचा व्हिडीओ व्हायरल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘बिग बॉस हिंदी’मुळे प्रसिद्धीझोतात आलेला शिव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. बिग बॉसनंतर अमरावतीच्या शिवच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. सध्या शिवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेचा एक व्हिडीओ विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये शिव डोसा खाताना दिसत आहे. चमच्याने डोसा न खाता हाताने खाल्ल्यामुळे शिववर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत शिवचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा>>Video: जिनिलीयाने सगळ्यांसमोर रितेश देशमुखला “अहो” म्हणून मारली हाक, अभिनेता लाजला अन्…; व्हिडीओ व्हायरल

“शिव ठाकरे एकदम आमच्यासारखाच माणूस आहे” अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “तू खूप पुढे जाशील” असंही एकाने म्हटलं आहे.

shiv thakare

वाचा>> नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीची कर्करोगाशी झुंज; तुरुंगात असलेल्या पतीसाठी भावनिक पोस्ट, म्हणाल्या “कलियुग…”

एका नेटकऱ्याने “या मुलाचे पाय जमिनीवर आहेत. देव तुला खूप यश देवो”, अशी कमेंट केली आहे. “हा एकदम देशी आहे. देशी स्टाइल”, असंही एकाने म्हटलं आहे.

shiv thakare

“चमच्याने डोसा खाल्ल्याचा फील येत नाही. चव तर हातानेच येते”, असं शिव व्हिडीओत म्हणाला आहे. काही दिवसांपूर्वीच शिवने महागडी कार खरेदी केली होती. त्यानंतर नुकतंच त्याने ‘ठाकरे: चाय अँड स्नॅक्स’ हा त्याचा स्वत:चा ब्रँडही लाँच केला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 14:34 IST

संबंधित बातम्या