scorecardresearch

Video: शिव ठाकरेला पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी, बॉडीगार्डलाही आवरणं झालं कठीण अन्…; व्हिडीओ व्हायरल

शिव ठाकरेचा व्हिडीओ तुफान व्हायरल

shiv thakare fans video
शिव ठाकरेचा व्हिडीओ व्हायरल. (फोटो : विरल भय्यानी)

‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. बिग बॉस संपल्यानंतर शिव ठाकरेची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. त्याच्या चाहत्यांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. शिवचा एका कार्यक्रमादरम्यानचा व्हिडीओ समोर आला आहे.

‘विरल भय्यानी’ या पापाराझी पेजवरुन शिवचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये शिवला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. शिव ठाकरेला हात मिळवण्यासाठी चाहत्यांनी त्याच्या भोवती घोळका केला आहे. शिवभोवती असलेली गर्दी त्याच्या बॉडीगार्डलाही आवरणं कठीण झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे, शिवचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> ‘बिग बॉस मराठी’ फेम अपूर्वा नेमळेकर ‘या’ ऐतिहासिक चित्रपटात झळकणार, व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणते…

हेही पाहा>> Photos: भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र अन्…; अंकिता लोखंडेच्या मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष, फोटोंवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस

‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वातील शिव सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या सदस्यांपैकी एक होता. ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीचा तो प्रबळ दावेदारही मानला गेला होता. प्रेक्षकांची मनं जिंकत टॉप २मध्ये स्थान मिळवलेल्या शिवला मात्र दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

हेही वाचा>> ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’चे टॉप ३ स्पर्धक समोर, महाराष्ट्राच्या सुवर्णा बाजी मारणार का? पोस्ट शेअर करत म्हणाल्या “श्री स्वामी समर्थ…”

‘बिग बॉस’मधून प्रसिद्धी मिळालेल्या शिव ठाकरेला मराठी व हिंदी चित्रपटांची ऑफर मिळाली आहे. शिवने काही दिवसांपूर्वीच नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. याबरोबरच शिवने ‘ठाकरे : चाय आणि स्नॅक्स’ हा त्याचा स्वत: चा ब्रँडही सुरू केला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 19:43 IST

संबंधित बातम्या