'इमली' मालिकेतून घराघरात पोहोचलेली सुम्बुल तौकीर टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सुम्बुल 'बिग बॉस' या रिएलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. 'बिग बॉस'च्या १६व्या पर्वातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक होती. सुम्बुल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सुम्बुलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नुकतीच एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. सुम्बुलच्या घरातील पाळीव मांजरीचं निधन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही बातमी दिली आहे. सुम्बुलने हातातील ब्रेसलेटचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या ब्रेसलेटवर मांजर असल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करत सुम्बुलने भावुक पोस्ट लिहिली आहे. https://www.instagram.com/p/Cs2hp7OLJmV/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== हेही वाचा>> “तुमच्यासारखे पंतप्रधान…”, मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण होताच प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं ट्वीट "आय लव्ह यू…मी कायम तुला माझ्या हृदयात ठेवेन…तुला शांती मिळो, बच्चा…तू आमच्याबरोबर फक्त एक महिना राहिलीस, पण खूप छान आठवणी देऊन गेलीस…तू कायम आठवणीत राहशील…," असं सुम्बुलने पोस्टमध्ये म्हटलं आहे. सुम्बुलच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. हेही वाचा>> केके यांचं शेवटचं मराठी गाणं प्रदर्शित; ‘अंब्रेला’ चित्रपटातील गाण्याला तुफान प्रतिसाद सुम्बुलने काही दिवसांपूर्वीच मुंबईत स्वत:चं घर खरेदी केलं आहे. या घराचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.