scorecardresearch

Video : “बाबा तू ये ना” वडिलांना पाहून चिमुकल्याच्या भावना अनावर, आरोह वेलणकरच्या लेकाने सगळ्यांनाच रडवलं

‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये लेकाला पाहून आरोह वेलणकर भावूक. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

Video : “बाबा तू ये ना” वडिलांना पाहून चिमुकल्याच्या भावना अनावर, आरोह वेलणकरच्या लेकाने सगळ्यांनाच रडवलं
'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये लेकाला पाहून आरोह वेलणकर भावूक. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व दिवसेंदिवस रंजक होत आहे. घरात आता मोजकेच सदस्य उरले आहेत. काही दिवसांनंतर या पर्वाचा अंतिम सोहळा पार पडेल. पण त्याचपूर्वी हा आठवडा घरातील सदस्यांसाठी फॅमिली विक असणार आहे. म्हणजेच सदस्यांना त्यांच्या घरातील मंडळी भेटण्यासाठी ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये येणार आहेत.

आणखी वाचा – Video : बायकोला पाहताच किरण मानेंनी घट्ट मिठी मारली, राखी सावंतचा उल्लेख करत म्हणाली, “तुम्ही आपल्या बाळांचे कपडे…”

कलर्स मराठी वाहिनीने यादरम्यानचा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आरोल वेलणकरचे कुटुंबिय घरामध्ये त्याला भेटण्यासाठी आलेले दिसत आहेत. यावेळी आरोहला अश्रू अनावर होतात.

पाहा व्हिडीओ

विशेष म्हणजे आरोहचा मुलगा जेव्हा त्याच्या पत्नी व आईसह घरात येतो तेव्हा एक वेगळंच चित्र पाहायला मिळतं. वडिलांना पाहिल्यानंतर आरोहचा चिमुकला त्याला घट्ट मिठी मारतो. आरोह लेकाला पाहून ढसाढसा रडू लागतो. तर पत्नीलाही घट्ट मिठी मारतो.

आणखी वाचा – “माझे पप्पा मास्टरमाइंड” किरण मानेंची लेक स्पष्टच बोलली, ‘तो’ टास्क पाहिल्यानंतर बायको व आईही भडकली

“मला तुझी आठवण येते बबी. बाबा तू ये ना” असं आरोहचा मुलगा त्याला घरातून बाहेर पडताना बोलतो. हे ऐकून आरोह अगदी भावूक होतो. वडील व मुलाचं नातं किती प्रेमळ आणि भावूक असतं हे आरोहचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 12:32 IST

संबंधित बातम्या