Video : "तुझ्या बापाचं..." राखी सावंत-आरोह वेलणकरमध्ये खडाजंगी | bigg boss marathi 4 Aroh velankar scolded Rakhi Sawant talk about father she getting angry video viral nrp 97 | Loksatta

Video : राखी सावंत-आरोह वेलणकरमध्ये खडाजंगी, म्हणाला “तुझ्या बापाचं…”

आरोह राखीला वडिलांवर बोलल्यानंतर ती भयंकर चिडली.

Video : राखी सावंत-आरोह वेलणकरमध्ये खडाजंगी, म्हणाला “तुझ्या बापाचं…”
राखी सावंत आरोह वेलणकर

‘बिग बॉस मराठी’चं चौथ्या पर्वाची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बिग बॉसचे यंदाचे पर्व सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचे धक्के मिळत आहेत. नुकंतच बिग बॉस मराठीच्या घरातून रोहित शिंदेला बाहेर पडावे लागले. त्यानंतर आता बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन कार्यात अभिनेत्री राखी सावंत आणि आरोह वेलणकर यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली.

बिग बॉस मराठीच्या घरात येत्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी “शाई फेक” हे नॉमिनेशन कार्य रंगले आहे. या कार्यात कोण कोणाला नॉमिनेट करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे. सध्या बिग बॉसच्या घरात दोन नवीन सदस्य पाहायला मिळत आहे. ते येत्या आठवड्यापासून नॉमिनेशन कार्यात सहभागी होऊ शकणार आहेत. या सदस्यांनाही नॉमिनेट करता येणार आहे.
आणखी वाचा : “ओंकारने आधीच सांगितलं असतं तर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक स्पष्टच बोलले

नुकतंच या नॉमिनेशनचा एक प्रोमो कलर्स मराठीने शेअर केला आहे. या नॉमिनेशन कार्यावेळी आरोह आणि राखी यांच्या खडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी आरोह हा राखीवर आरोप करताना दिसत आहे. “राखी प्रत्येक वेळा कुरघोड्या करणं, गळ्यात लिंबू मिरची लटकवणं हे चर्चेत राहण्यासाठी करते”, असे आरोह म्हणाला. त्यावर राखी म्हणाली की “मी ह्याच्यासारखी पूर्ण दिवस झोपून तर राहत नाहीये.” यावर ‘तुझ्या बापाचं काय जातं?’ असे आरोह तिला म्हणाला. आरोह राखीला वडिलांवर बोलल्यानंतर ती भयंकर चिडली. ‘तू वडिलांवर जाऊ नकोस’, असे तिने त्याला रागात म्हटलं.

आणखी वाचा : “नक्कल करण्यापेक्षा…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकाचा ‘फू बाई फू’ला टोला

त्यावर आरोहने ‘मी जाणार’ असे तिला ठणकावून सांगितले. यामुळे राखी आणि आरोह यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी राखी भयंकर चिडल्याचे पाहायला मिळत आहे. ती यावेळी आरोहच्या अंगावर धावून जाताना पाहायला मिळत आहे. दरम्यान आता हा आठवडा कोणता सदस्य गाजवणार ? पुढच्या आठवड्यात कोण घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होणार ? को सेफ होणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 13:16 IST
Next Story
Video : बहिणीच्या लग्नाची पत्रिका स्वतः तयार करतेय सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…