scorecardresearch

“राखी सावतंमुळे ‘बिग बॉस’ला टीआरपी मिळतो, पण…”, आरोह वेलणकर स्पष्टच बोलला

Bigg Boss Marathi 4: घरातून बाहेर पडलेल्या आरोह वेलणकरचं राखी सावंतबाबत वक्तव्य

“राखी सावतंमुळे ‘बिग बॉस’ला टीआरपी मिळतो, पण…”, आरोह वेलणकर स्पष्टच बोलला
आरोह वेलणकरचं राखी सावंतबाबत वक्तव्य. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक असणाऱ्या आरोह वेलणकरचा प्रवास संपला आहे. प्रसाद जवादे पाठोपाठ आरोहने वेलणकरनेही बुधवारी  बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. घरातून बाहेर पडताच आरोहने बिग बॉसवर गंभीर आरोपही केले आहेत.

आरोहने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत आरोहला राखी सावंतबद्दल प्रश्न विचारण्यात आला. राखीच्या घरातील वागणुकीमुळे आरोह नेहमीच त्रस्त दिसायचा. अनेकदा त्याचे राखीबरोबर घरात खटकेही उडालेले पाहायला मिळायचे. राखीच्या वागणुकीबद्दल आरोह म्हणाला, “राखी एक वेगळी व्यक्ती आहे. ती कशी आहे, यावर मी भाष्य करू शकत नाही. ती ज्या काही गोष्टी करते त्यामुळे प्रचंड टीआरपी मिळतो. पण तिच्याबरोबर घरात राहणं फार अवघड आहे”.

हेही वाचा>>“तेजस्विनी पंडितला नोटीस पाठवली, मग उर्फीला का नाही?”, चित्रा वाघ यांचा महिला आयोगाला सवाल

हेही वाचा>>“पात्रता नसलेले स्पर्धक अजूनही…”, घरातून बाहेर पडताच आरोह वेलणकरचे ‘बिग बॉस’वर गंभीर आरोप

“प्रत्येक व्यक्ती वेगळ्या परिस्थितीत लहानाची मोठी होते. प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या असतात. राखीसारखं व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तीला मी यापूर्वी कधीही भेटलेलो नाही. बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात अभिजीत बिचुकले होते. पण ते तिच्यासारखे मुद्दाम काही करायचे नाहीत. राखी सगळं ठरवून करते”, असंही आरोह म्हणाला.

हेही वाचा>> Video: पार्टी लूक, ग्लॅमरस अंदाज, डान्स अन्…; अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्याचा टीझर पाहिलात का?

‘बिग बॉस’च्या घरातून यंदाच्या आठवड्यात दोन सदस्य घराबाहेर पडले. प्रसाद जावदे व आरोह वेलणकर घरातून बाहेर पडल्यानंतर आता टॉप ५ फायनलिस्ट राहिले आहेत. ८ जानेवारील ‘बिग बॉस मराठी’चा अंतिम सोहळा पार पडणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 19:19 IST

संबंधित बातम्या