scorecardresearch

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगले डबल एलिमिनेशन, विकास सावंत पडला बाहेर

Bigg Boss Marathi 4 Elimination : विकास सावंत हा घराबाहेर पडल्याने आता नवी समीकरण पाहायला मिळणार आहेत.

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगले डबल एलिमिनेशन, विकास सावंत पडला बाहेर
विकास सावंत बिग बॉसच्या घराबाहेर

Bigg Boss Marathi 4 Elimination : छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस मराठी’कडे पाहिले जाते. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. गेल्या २ ऑक्टोबरपासून सुरु झालेले ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व संपायला अवघे २१ दिवस शिल्लक राहिले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात आता फक्त ९ स्पर्धक उरले आहेत. आता ‘बिग बॉस’च्या घरात डबल एलिमिनेशन पार पडले आहे. नुकतंच ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून विकास सावंत बाहेर पडला आहे.

‘बिग बॉस मराठी’चे ग्रँड फिनालेला अवघे २१ दिवस शिल्लक राहिले आहेत. सध्या ‘बिग बॉस’मध्ये अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, अमृता देशमुख, अमृता धोंगडे, किरण माने, विकास सावंत, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, आरोह वेलणकर हे सदस्य उरले आहेत. नुकतंच त्या सदस्यांमध्ये एलिमेनेशन कार्य पार पडले.
आणखी वाचा : “बिग बॉस आदेश देत आहे की…” आवाजामागचे गुपित उलगडले

येत्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’च्या घरात डबल एलिमिनेशन पार पडणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आठवड्याभरात झालेल्या खेळाच्या आधारे काही सदस्य नॉमिनेट झाले. त्यात आज ‘बिग बॉस’च्या घरातून विकास सावंत बाहेर पडला. यावेळी घरातील सदस्य भावूक झाले. विकास सावंतने घराबाहेर पडल्यानंतर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आणि किरण माने यांना विविध सल्ले दिले.

आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : ‘शेवंता’, किरण माने अन् ‘मिसेस मुख्यमंत्री’…, ‘बिग बॉस’च्या घरात सहभागी होणाऱ्या कलाकारांची संपूर्ण यादी 

‘बिग बॉस’च्या घरात आल्यापासून विकास सावंत हा सातत्याने चर्चेत होता. या कार्यक्रमातून त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. सुरुवातीचे काही आठवडे विकास आणि किरण माने यांची जोडी पाहायला मिळाली. त्यानंतर अपूर्वा नेमळेकर आणि विकास सावंत यांचीही जोडी चांगली जमली होती. याचे फोटो आणि व्हिडीओही समोर आले होते. मात्र आता विकास सावंत हा घराबाहेर पडल्याने आता नवी समीकरण पाहायला मिळणार आहेत.

दरम्यान ‘बिग बॉस मराठी’च्या पुढच्या आठवड्यात कोण राहील ? कोण जाईल ? कोण होईल कॅप्टन ? कोण होईल नॉमिनेट ? कोण होईल सेफ ? हे येत्या आठवड्यात ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2022 at 22:56 IST

संबंधित बातम्या