scorecardresearch

Bigg Boss Marathi 4 : अक्षय केळकर ‘बिग बॉस’चा विजेता ठरल्यानंतर अपूर्वा नेमळेकरची पहिली पोस्ट, म्हणाली…

‘आमच्यासाठी तूच विजेती आहेत. तू अक्षयपेक्षा जास्त पात्र आहेस’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

Bigg Boss Marathi 4 : अक्षय केळकर ‘बिग बॉस’चा विजेता ठरल्यानंतर अपूर्वा नेमळेकरची पहिली पोस्ट, म्हणाली…
अपूर्वाने शेअर केलेल्या या पोस्टवर तिचे चाहते कमेंट करताना दिसत आहेत.

Bigg Boss Marathi 4 Final Winner : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मानल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस मराठीच्या’ चौथ्या पर्वाने अखेर निरोप घेतला. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आज (८ जानेवारी) रंगला. यंदाच्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकर ठरला. सध्या त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. त्यातच आता अपूर्वा नेमळेकरने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

यंदा बिग बॉसमध्ये अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे हे स्पर्धक टॉप ५ स्पर्धक ठरले. यावेळी राखी सावंत ही ९ लाख रुपये घेऊन बिग बॉसच्या स्पर्धेतून बाहेर पडली. त्यापाठोपाठ अमृता धोंगडेंनीही एक्झिट घेतली. त्यामुळे घरात फक्त अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर आणि किरण माने हे तिघेजण टॉप ३ स्पर्धक होते. यानंतर किरण माने हे घराबाहेर पडले. त्यामुळे बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचे टॉप २ सदस्य हे अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर ठरले.

आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 Grand Finale : ‘बिग बॉस मराठी’ चौथ्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा, अक्षय केळकरने कोरले ट्रॉफीवर नाव

आता या दोघांमध्ये अक्षय केळकर हा चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. त्याबरोबर त्याला पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाऊचरही देण्यात आले.

आणखी वाचा : “बाकी ते ठरवतीलचं…” रुचिरा जाधवने केली ‘बिग बॉस मराठी’च्या निर्मात्यांची पोलखोल

अक्षय केळकर विजेता झाल्यानंतर आता अपूर्वा नेमळेकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचा एक फोटो पोस्ट करत तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहे. “प्रवास संपला तरीही तुमचं प्रेम काही कमी झालं नाही अपूर्वा आर्मी आणि माझ्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार ! हा प्रवास तुमच्या शिवाय अपूर्ण आहे”, असे अपूर्वा नेमळेकर म्हणाली.

अपूर्वा नेमळेकरच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. ‘आमच्यासाठी तूच विजेती आहेत. तू अक्षयपेक्षा जास्त पात्र आहेस’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. ‘तू माझ्यासाठी विजेती आहे’, असे एकाने कमेंट करताना म्हटले आहे. ‘तूच विजेतेपदासाठी खरोखर पात्र आहेस’, अशीही कमेंट एक व्यक्ती करताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2023 at 00:00 IST

संबंधित बातम्या