scorecardresearch

Bigg Boss Marathi 4 Grand Finale : अक्षय केळकर ठरला ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता

Bigg Boss Marathi 4 Final Updates : अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता असल्याची घोषणा करण्यात आली.

Bigg Boss Marathi 4 Grand Finale : अक्षय केळकर ठरला ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता

Bigg Boss Marathi 4 Grand Finale Updates : ‘बिग बॉस’ मराठीचा महाअंतिम सोहळा अखेर आज (८ जानेवारी) पार पडला. यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यावेळी बिग बॉस मराठीच्या विजेत्याची घोषणा करण्यात आली. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकर ठरला. तर अपूर्वा नेमळेकरने दुसरे स्थान पटकावले.

तब्बल १०० दिवसांचा खेळ पूर्ण केल्यानंतर ‘बिग बॉस’च्या घराला टॉप ५ सदस्य मिळाले आहेत. यात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे या स्पर्धकांचा समावेश आहे. बिग बॉस मराठीचा १०० दिवसांचा प्रवास आज संपला. या कार्यक्रमाच्या या पर्वाला देखील संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले. प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकायला पहिल्या भागापासून सुरुवात केली. प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये फक्त बिग बॉस मराठीची चर्चा रंगताना दिसली.

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबई येथे पार पाडला. यावेळी अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता असल्याची घोषणा करण्यात आली. अक्षय केळकरला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार इतकी रक्कम मिळाली.

दरम्यान अक्षय केळकर हा खेळाडू वृत्ती, टास्क मधली मेहनत, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो नेहमीच चर्चेत राहिला. बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये सदस्य म्हणून जाण्याची संधी त्याला मिळाली आणि आता तो या पर्वाचा विजेता ठरला.

Live Updates

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबई येथे पार पाडला. यावेळी अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता असल्याची घोषणा करण्यात आली. अक्षय केळकरला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार इतकी रक्कम मिळाली.

23:07 (IST) 8 Jan 2023
Bigg Boss Marathi 4 Grand Finale Live : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला अक्षय केळकर

‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा रंजक प्रवास आता संपला आहे. ‘बिग बॉस’ मराठीचा महाअंतिम सोहळा आज रंगला होता. स्पर्धकांचे धमाल डान्स परफॉर्मन्सेस झाले. त्यानंतर वेगवेगळ्या टास्कमधून एक एका स्पर्धक बाहेर पडले, आणि अखेर टॉप २मध्ये अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर राहिले. अखेर बाजी मारली ती अक्षय केळकरने, बिग बॉस ४ चा तो विजेता ठरला आहे.

22:19 (IST) 8 Jan 2023
Bigg Boss Marathi 4 Grand Finale Live : बिग बॉसच्या घरातून किरण माने बाहेर

बिग बॉस’ मराठीच्या महाअंतिम सोहळ्याला सुरवात झाली आहे. टॉप ५ मधले दोन स्पर्धक घराबाहेर पडले त्यानंतर आता आणखीन एक स्पर्धक बाहेर पडला आहे. या टास्कमध्ये स्पर्धकांसमोर तीन दरवाज्यांसमोर उभे करण्यात आले त्यांना दरवाजा निवडण्याचा पर्याय दिला. ज्याचा दरवाजा उघडेल तो घराच्या बाहेर असा टास्क होता. आणि अखेर किरण मानेंचा दरवाजा उघडला आणि ते घराबाहेर पडले

https://www.instagram.com/p/CnKVGP-vtlZ/?igshid=YmMyMTA2M2Y=

21:48 (IST) 8 Jan 2023
Bigg Boss Marathi 4 Grand Finale Live : ४० वर्षानंतर प्रसाद जवादे, आरोह वेलणकर भेटले तर..

बिग बॉस’ मराठीच्या महाअंतिम सोहळ्याला सुरवात झाली आहे. टॉप ५ मधले दोन स्पर्धक घराबाहेर पडले आहेत, आता किरण माने, अक्षय केळकर आणि अपूर्वा नेमळेकर हे तिघे घरात आहेत. स्पर्धकांच्या डान्स परफॉर्मन्सनंतर आता प्रसाद जवादे, आरोह वेलणकर यांनी एक धमाकेदार स्किट सादर करत आहेत. ज्यात ते ४० वर्षानंतर भेटल्यावर काय गप्पा मारतील यावर दोघांच्या संभाषण सुरु आहे. हे मजेदार स्किट सगळ्यांनी एन्जॉय करत आहेत.

21:18 (IST) 8 Jan 2023
Bigg Boss Marathi 4 Grand Finale Live : बिग बॉसच्या घरातून अमृता धोंगडे बाहेर

बिग बॉस’ मराठीच्या महाअंतिम सोहळ्याला सुरवात झाली आहे. स्पर्धकांच्या धमाकेदार डान्सनंतर आता 'बझर राउंड' झाला ज्यात राखी सावंत बाहेर पडली आता नवा टास्क सुरु झाला आहे. ज्यात उरलेले ४ स्पर्धक एक बॉक्स मध्ये उभे राहिले , बॉक्सच्या बाहेर दिवे लावले होते ज्याच्या बॉक्स बाहेरचा दिवा बंद होईल तो स्पर्धक घराबाहेर आणि अखेर या टास्कमधून अमृता धोंगडे आउट झाली

https://www.instagram.com/p/CnKONnrvslK/?igshid=YmMyMTA2M2Y=

21:12 (IST) 8 Jan 2023
Bigg Boss Marathi 4 Grand Finale Live : ‘बिग बॉस’ मराठीच्या महाअंतिम सोहळ्यातील नवा टास्क सुरु

बिग बॉस’ मराठीच्या महाअंतिम सोहळ्याला सुरवात झाली आहे. स्पर्धकांच्या धमाकेदार डान्सनंतर आता 'बझर राउंड' झाला ज्यात राखी सावंत बाहेर पडली आता नवा टास्क सुरु झाला आहे. ज्यात उरलेले ४ स्पर्धक एक बॉक्स मध्ये उभे राहणार आहेत. बॉक्सच्या बाहेर दिवे असणार आहेत ज्याच्या बॉक्स बाहेरचा दिवा बंद होईल तो सदस्य घराबाहेर असणार आहे

20:49 (IST) 8 Jan 2023
Bigg Boss Marathi 4 Grand Finale Live : ‘बिग बॉस’ मराठीच्या महाअंतिम सोहळ्यात मेघा घाडगेचा ‘काटा किर्रर्र’ परफॉर्मन्स

ठसकेबाज लावणी व अदांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेणारी मेघा ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. मेघाने तिचा लावणीतील ठसकेबाजपणा ‘बिग बॉस’च्या घरातही दाखवला होता. या सोहळयात तिने काटा किर्रर्र परफॉर्मन्स दिला आहे. तिने या गाण्यावर डान्स केला आहे

20:16 (IST) 8 Jan 2023
Bigg Boss Marathi 4 Grand Finale Live : बिग बॉसच्या घरातून राखी सावंत बाहेर

बिग बॉस’ मराठीच्या महाअंतिम सोहळ्याला सुरवात झाली आहे. स्पर्धकांच्या धमाकेदार डान्सनंतर आता 'बझर राउंड' सुरु झाला आहे. ज्यात टॉप स्पर्धकांपुढे एक पर्याय ठेवला आहे, ज्यात स्पर्धकांपुढे आता ९ लाखांचा पर्याय ठेवण्यात आला जो हा पर्याय निवडेल तो घराच्या बाहेर पडेल. आणि अखेर राखी सावंतने बझर दाबून हा पर्याय निवडला आहे. त्यामुळे ती आता घरातून बाहेर पडली आहे

https://www.instagram.com/p/CnKICGNvT6Y/?igshid=OGQ2MjdiOTE=

20:07 (IST) 8 Jan 2023
Bigg Boss Marathi 4 Grand Finale Live : ‘बिग बॉस’ मराठीच्या महाअंतिम सोहळ्यात बझर राउंडला सुरवात

बिग बॉस’ मराठीच्या महाअंतिम सोहळ्याला सुरवात झाली आहे. स्पर्धकांच्या धमाकेदार डान्सनंतर आता 'बझर राउंड' सुरु झाला आहे. ज्यात टॉप स्पर्धकांपुढे एक पर्याय ठेवला आहे, ज्यात स्पर्धकांपुढे ५ लाखांचा पर्यायात ठेवला आहे. हे पाच लाख रुपये घेऊन स्पर्धक घराबाहेर जाऊ शकतो. कारण या स्पर्धेत विजेता सोडल्यास इतरांना मोठे बक्षीस मिळणार नाही.

19:58 (IST) 8 Jan 2023
Bigg Boss Marathi 4 Grand Finale Live : ‘बिग बॉस’ मराठीच्या महाअंतिम सोहळ्यात किरण मानेंची ‘डॉन’गिरी

'बिग बॉस’ मराठीच्या महाअंतिम सोहळ्याला सुरवात झाली आहे. 'बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे किरण माने कायमच चर्चेत राहिले आहेत. नुकताच त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या 'मै हू डॉन' या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांचा हा अंदाज प्रेक्षकांना आवडला आहे

19:45 (IST) 8 Jan 2023
Bigg Boss Marathi 4 Grand Finale Live : ‘बिग बॉस’ मराठीच्या महाअंतिम सोहळ्यात राखी सावंतचा बोल्ड डान्स

'बिग बॉस’ मराठीच्या महाअंतिम सोहळ्याला सुरवात झाली आहे. हिंदी बिग बॉसमध्ये आपला जलवा दाखवणारी राखी सावंत या पर्वात वाईल्ड कार्ड एंट्रीतुन सहभागी झाली. कार्यक्रमात तिने 'टीप टीप बरसा पानी' या गाण्यावर डान्स केला आहे. या गाण्यातून तिचा बोल्डनेस दिसून आला. होस्ट महेश मांजरेकरांनी तिचे कौतुक केले.

19:27 (IST) 8 Jan 2023
Bigg Boss Marathi 4 Grand Finale Live : ‘बिग बॉस’ मराठीच्या महाअंतिम सोहळ्यात स्पर्धकांचा धमाल डान्स

बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा रंजक प्रवास आता लवकरच संपणार आहे. ‘बिग बॉस’ मराठीच्या महाअंतिम सोहळ्याला सुरवात झाली आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीलाच राखी सावंत, अपूर्वा नेमळेकर, अमृता अमृता धोंगडे, अक्षय केळकर यांनी 'करंट लगा' गाण्यावर धमाल डान्स केला. प्रेक्षकांनी या डान्सला पसंती दर्शवली.

19:12 (IST) 8 Jan 2023
Bigg Boss Marathi 4 Grand Finale Live : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात राखी सावंतची कडक डायलॉगबाजी

‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वात अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. हिंदी बिग बॉसमध्ये आपल्या जलवा दाखवणारी राखी सावंत या पर्वात वाईल्ड कार्ड एंट्रीतुन सहभागी झाली, 'अंड्याची भुर्जी आणि राखी सावंतची मर्जी' या घरात चालणार अशी कडक डायलॉगबाजी करत तिने एंट्री घेतली. या पर्वात नेहमीप्रमाणे ती आपल्या बिनधास्त अंदाजात वावरली. आरोह आणि तिच्यात बराच वाद रंगला होता. या पर्वाच्या अंतिम सोहळ्याला सुरवात झाली आहे.

https://www.instagram.com/reel/CnJ3VVsDMNG/?igshid=YmMyMTA2M2Y=

18:53 (IST) 8 Jan 2023
Bigg Boss Marathi 4 Grand Finale Live : ‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी कोण जिंकणार?

https://www.instagram.com/p/CnI7RLmDgu7/

18:51 (IST) 8 Jan 2023
Bigg Boss Marathi 4 Grand Finale Live : ‘बिग बॉस मराठी’च्या विजेत्याला मिळणाऱ्या ट्रॉफीचा पहिला लूक समोर, पाहा व्हिडीओ

Bigg Boss Marathi 4 Grand Finale Live : ‘कलर्स मराठी’ने इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत बिग बॉसने यंदाच्या बिग बॉसची ट्रॉफीची झलक दाखवली आहे. ही ट्रॉफी पाहून सर्वजणच थक्क होताना पाहायला मिळत आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या विजेत्याला मिळणाऱ्या ट्रॉफीचा पहिला लूक समोर, पाहा व्हिडीओ

18:49 (IST) 8 Jan 2023
Bigg Boss Marathi 4 Grand Finale Live : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील टॉप ५ स्पर्धक

Bigg Boss Marathi 4 Grand Finale Live : बिग बॉस मराठी या पर्वाची सुरुवात २ ऑक्टोबरला झाली होती. यावेळी तब्बल १६ स्पर्धक बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होते. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील टॉप ५ स्पर्धकांची नावे काही दिवसांपूर्वी समोर आली.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील टॉप ५ स्पर्धक

18:47 (IST) 8 Jan 2023
Bigg Boss Marathi 4 Grand Finale Live : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता कोण? लवकरच घोषणा

Bigg Boss Marathi 4 Grand Finale Live : ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा रंजक प्रवास आता लवकरच संपणार आहे. ‘बिग बॉस’ मराठीचा महाअंतिम सोहळा आज रंगणार आहे. सध्या बिग बॉस मराठीच्या महाअंतिम सोहळ्याची जय्यत तयाराही सुरु आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता कोण? अवघ्या काही तासातच होणार घोषणा

बिग बॉस मराठीचा १०० दिवसांचा प्रवास आज संपला. या कार्यक्रमाच्या या पर्वाला देखील संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले. प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकायला पहिल्या भागापासून सुरुवात केली. प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये फक्त बिग बॉस मराठीची चर्चा रंगताना दिसली.

First published on: 08-01-2023 at 18:42 IST

संबंधित बातम्या