छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त तरीही लोकप्रिय शो म्हणून ‘बिग बॉस मराठी’ला ओळखले जाते. आज रविवार २ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व सुरु होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या पर्वाचा ग्रँड प्रीमीयर कलर्स मराठीवर प्रसारित झाला. आतापर्यंत बिग बॉसच्या घरात प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली आहे. त्यांच्यासह अभिनेता अक्षय केळकरने बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे. यावेळी बिग बॉसच्या मंचावर महेश मांजरेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केला.

बिग मराठीमध्ये अक्षय केळकरने एंट्री केल्यानंतर त्याला होस्ट महेश मांजरेकर यांनी ‘आता इथंपर्यंत कसा आलास?’ असा प्रश्न केला होता. यावर उत्तर देताना अक्षय केळकरने “मी बाबांच्या रिक्षातून आलोय. मी एक अभिनेता असलो तरी माझे बाबा आजही रिक्षा चालवतात. मी कितीही कमावत असलो तरी त्यांना रिक्षा चालवायचीच आहे असं ते सांगतात.” असं म्हटलं होतं. यानंतर महेश मांजरेकर यांनी त्याच्या बाबांचं कौतुक करत बिग बॉसच्या मंचावर बोलावलं.

आणख वाचा- “माझ्या आईचा विरोध होता कारण…” अपूर्वा नेमळेकर झाली भावूक

महेश मांजरेकर यांनी अक्षय केळकरच्या बाबांना प्रश्न विचारला की, “मुलगा एवढा कमावतो. आता त्याच्या करिअरमध्येही स्थैर्य आलंय मग तुम्ही रिक्षा का चालवता. आता निवृती घ्या ना.” त्यावर अक्षयचे बाबा म्हणाले, “नाही मी रिक्षा चालवणं कधीच सोडणार नाही. त्याने माझं आरोग्य चांगलं राहातंय.” त्यांच्या या उत्तरावर कौतुक करत महेश मांजरेकर म्हणाले, “व्वा, कोणतंही काम उच्च किंवा कमी दर्जाचं नसतं. आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही कधी काळी रिक्षा चालवत होते. त्यांचा रिक्षावाला ते राज्याचा मुख्यमंत्री हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. एक दिवस तुमचा मुलगाही खूप यशस्वी होईल.”

आणखी वाचा- Bigg Boss Marathi 4 : “इंडस्ट्रीतल्या काही कारस्थानी लोकांनी…” बिग बॉसच्या घरात एंट्री घेताच किरण मानेंची फटकेबाजी

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची थीम ‘ऑल इज वेल’ अशी आहे. यापूर्वी एक प्रोमोमध्ये होस्ट महेश मांजरेकर यांनी या पर्वात भांडणं, गोंधळ नसणार असं म्हटलं होतं. पण बिग बॉसच्या घरात वादाची ठिणगी पडायला फारसा वेळ लागत नाही हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण यावेळी हे स्पर्धक प्रेक्षकांना काय वेगळं मनोरंजन कसं काय करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पण पुढेच १०० दिवस प्रेक्षकांचं धम्माल मनोरंजन होणार हे नक्की.दरम्यान आतापर्यंत बिग बॉस मराठीच्या घरात आतापर्यंत तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, अमृता धोंगडे, निखिल राजशिर्के, किरण माने, समृद्धी जाधव, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, योगेश जाधव, यशश्री मसुरकर, अमृता देशमुख, विकास सावंत, मेघा घाडगे, त्रिशूल मराठे, रुचिरा जाधव, रोहित शिंदे यांनी एंट्री केली आहे.