bigg boss marathi 4 prasad jawade rap on rakhi sawant and captain akshay kelkar video viral | Loksatta

Video: “अंघोळ घालतेय राखी सावंत…” ड्रामा क्वीनने फ्लर्ट केल्यानंतर जागा झाला प्रसाद जवादेमधील रॅपर; घरातील सदस्यांनाही हसू अनावर

प्रसाद जवादेने केला राखी सावंतवर रॅप, ‘बिग बॉस’च्या घरातील व्हिडीओ व्हायरल

Video: “अंघोळ घालतेय राखी सावंत…” ड्रामा क्वीनने फ्लर्ट केल्यानंतर जागा झाला प्रसाद जवादेमधील रॅपर; घरातील सदस्यांनाही हसू अनावर
प्रसाद जवादेने राखी सावंतवर केलेल्या रॅपचा व्हिडीओ व्हायरल. (फोटो: कलर्स मराठी)

छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. भांडणतंटे, वादविवाद यामुळे हा शो कायमच चर्चेत असतो. ‘बिग बॉसच्या मराठी’च्या चौथ्या पर्वालाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. गेल्याच आठवड्यात राखी सावंतने वाइल्ड कार्डद्वारे ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला.

एंटरटेनमेंटचं फूल पॅकेज असलेली राखी सावंत ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यापासूनच चर्चेत राहण्यासाठी ड्रामा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात ती प्रसाद जवादेबरोबर फ्लर्ट करताना दिसून आली होती. तर आता प्रसादने राखीसाठी रॅप बनवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

हेही वाचा >> राणादा-पाठकबाईंच्या रिसेप्शन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आला अन्…; हार्दिक-अक्षयाच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल

‘बिग बॉस’च्या घरातील डायनिंग एरियामध्ये प्रसाद, राखी व घरातील इतर सदस्यही बसलेले दिसत आहेत. यंदाच्या आठवड्यात अक्षय केळकर घराचा कॅप्टन आहे. अक्षय व राखीवर प्रसादने धम्माल रॅप बनवला आहे. प्रसादच्या या रॅपचा व्हिडीओ ‘कलर्स मराठी’च्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा>> “मी आज अरबाजमुळेच…” पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल मलायका अरोराने केलेलं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा>> महापरिनिर्वाण दिनी गौरव मोरेची खास पोस्ट, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो शेअर करत म्हणाला…

“अक्षय केळकरच्या राज्यात आली फाइव्ह स्टार कॅप्टनशिप, अंघोळ घालतेय राखी सावंत फाइव्ह स्टार कॅप्टनला…कॅप्टनशिपच्या काळात आजपर्यंत एवढे वाद कधीच घडले नाही…नॉमिनेशन चालू होतं आपलं…चालू होतं कसं बसं…पण या कॅप्टन्सीमध्ये वाद घडले मोठे…कॅप्टन आले…पण राखीने अंघोळ घातली तर…लोळेलही फाइव्ह स्टार कॅप्टन” असं व्हिडीओमध्ये प्रसाद म्हणताना दिसत आहे. प्रसादचा रॅप ऐकून घरातील सदस्यांनाही हसू फुटल्याचं दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 12:58 IST
Next Story
“…म्हणून तिची बाजू घेतलीच नाही” रोहित शिंदेने सांगितले रुचिराला बिग बॉसमध्ये पाठिंबा न देण्याबद्दलचे कारण