Video : "तुझा एक हात तुटला आहे आता दुसराही..." पहिल्याच दिवशी राखी सावंत व तेजस्विनीमध्ये जोरदार भांडण | bigg boss marathi 4 rakhi sawant fight with tejaswini lonari video goes viral on social media | Loksatta

Video : “तुझा एक हात तुटला आहे आता दुसराही…” पहिल्याच दिवशी राखी सावंत व तेजस्विनीमध्ये जोरदार भांडण

‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये प्रवेश करताच राखी सावंतने वादाला सुरुवात केली आहे.

Video : “तुझा एक हात तुटला आहे आता दुसराही…” पहिल्याच दिवशी राखी सावंत व तेजस्विनीमध्ये जोरदार भांडण
‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये प्रवेश करताच राखी सावंतने वादाला सुरुवात केली आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये आता एक नवा ट्विस्ट आला आहे. एकूण चार स्पर्धकांची घरा एन्ट्री झाली आहे. खी सावंत, विशाल निकम, आरोह वेलणकर व मीरा जग्गनाथ या सदस्यांनी घरात दमदार एन्ट्री केली. राखीला घरात पाहिल्यानंतर इतर सदस्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते. राखीने घरात प्रवेश करताच वादाला सुरुवात झाली आहे.

आणखी वाचा – “अंड्याची भुर्जी व राखी सावंतची मर्जी, ए शेवंते” ‘बिग बॉस मराठीच्या’ घरात प्रवेश करताच ड्रामा क्वीनची डायलॉग बाजी, प्रेक्षक म्हणतात…

राखीने घरात प्रवेश केला अन् तिने डायलॉग बाजी करण्यासा सुरुवात केली. अपूर्वा नेमळेकरला तर तिने चक्क ”ए शेवंते” अशी हाक मारली. आता राखीने घरात जाताच तेजस्विनी लोणारीशी वाद घालायला सुरुवात केली आहे.

कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रहिवासी संघ बोर्डवर पहिल्या नंबरला कोणाच्या नावाची पाटी लागणार यावरून तेजस्विनी व राखीमध्ये वाद रंगताना दिसत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 16 : ‘बिग बॉस १६’मध्ये लवकरच गोल्डन बॉयची एन्ट्री होणार, व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण

तेजस्विनी म्हणते, राखी मॅडम माझा नंबर आहे तो. राखी यावर उत्तर देत म्हणाली, “बरोबर आहे तो.” “मी माझ्या एक नंबरवर पाटी लावणार.” असं तेजस्विनी स्पष्टपणे राखीला सांगते. दोघींमध्ये वाद रंगत असताना एकमेकींच्या नावाची पाटी तोडणार असल्याचं त्या बोलतात. यावर राखी म्हणते, “तोड, आता तुझा एक हात तुटला आहे. दुसरा हातही तुटेल.” हा वाद आता कितपत वाढणार हे येत्या भागामध्ये कळेलच.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 18:41 IST
Next Story
“मी स्वतःला पात्र समजत नाही…” ‘मृदगंध पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर श्रेया बुगडेच्या पोस्टने वेधलं लक्ष