scorecardresearch

Video : जबरदस्ती घास भरवला, डान्स केला; राखी सावंतच्या अंगात आलं भूत, घाबरुन विकास सावंत स्टोअर रुममध्ये लपला अन्…

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस’च्या घरात राखीने विकास सावंतला बनवलं पती; व्हिडीओ व्हायरल

Video : जबरदस्ती घास भरवला, डान्स केला; राखी सावंतच्या अंगात आलं भूत, घाबरुन विकास सावंत स्टोअर रुममध्ये लपला अन्…
बिग बॉसच्या घरातील राखी व विकासचा व्हिडीओ व्हायरल. (फोटो: कलर्स मराठी)

छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त असणारा ‘बिग बॉस’ हा शो आवडीने पाहिला जातो. सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची सर्वत्र चर्चा आहे. राखी सावंतने एन्ट्री घेतल्यापासूनच घरात ड्रामा करायला सुरुवात केली होती. अमृता देशमुखला त्रास दिल्यानंतर आता तिने विकास सावंतबरोबरचा राखीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

राखीने ड्रामा करुन गेल्या अनेक दिवसांपासून घर डोक्यावर घेतल्याचं पाहायला मिळत आहे. आता येणाऱ्या भागात ती विकासला त्रास देताना दिसणार आहे. याची झलक एका प्रोमो व्हिडीओमध्ये दिसली आहे. कलर्स मराठीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. राखीने आता ‘बिग बॉस’च्या घरात विकासला नवरा बनवून नवीन ड्रामा सुरू केला आहे.

हेही वाचा>> “तो मर्द आहे…” अर्जुन कपूरवरुन ट्रोल करणाऱ्यांना मलायका अरोराने सुनावलं

हेही वाचा>> सलमान खान रिलेशनशिपमध्ये? ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीबरोबर डेटिंगच्या चर्चांना उधाण

‘कलर्स मराठी’ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राखी विकासला राजू म्हणत त्याच्या मागे धावताना दिसत आहे. विकासला जेवण भरवून त्याच्याबरोबर डान्स करतानाही ती दिसत आहे. त्यानंतर ती विकासला तिचं भयानक रुपही दाखवत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. राखीपासून वाचण्यासाठी विकास पळ काढून थेट स्टोअर रुममध्ये जाऊन बॅगच्या मागे लपतो. त्यानंतर विकासला शोधत राखीही त्याच्या मागे धावते.

हेही वाचा>> Video: कुशल बद्रिकेची सिंघम स्टाइल एन्ट्री अन् सरु आजीचे डायलॉग ऐकून रणवीर सिंग पोट धरुन हसला, व्हिडीओ व्हायरल

‘बिग बॉस’चा खेळ दिवसेंदिवस अधिक रंजक होताना दिसत आहे. घरात चर्चेत राहण्यासाठी राखीचा फूल टाइम ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 18:55 IST

संबंधित बातम्या