bigg boss marathi 4 rakhi sawant kiran mane funny video viral | Loksatta

Video: राखी सावंतचा पदर पकडला, तिच्या मागे धावले अन्…; ‘बिग बॉस’च्या घरातील किरण मानेंचा व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस’च्या घरात किरण माने आले राखी सावंतच्या मदतीला धावून, व्हिडीओ व्हायरल

Video: राखी सावंतचा पदर पकडला, तिच्या मागे धावले अन्…; ‘बिग बॉस’च्या घरातील किरण मानेंचा व्हिडीओ व्हायरल
बिग बॉसच्या घरातील राखी सावंत व किरण मानेंचा व्हिडीओ व्हायरल. (फोटो: कलर्स मराठी)

छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त असलेला बिग बॉस हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहिला जातो. बिग बॉस मराठीचं चौथं पर्व पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच घरात राखी सावंतने एन्ट्री घेतली.

बिग बॉसच्या घरातील राखी सावंतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राखीने आरडाओरडा करुन घर डोक्यावर घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तितक्यात गार्डन एरियामधून किरण माने घरात येत “राखी काय झालं?” असं विचारताना दिसत आहेत.  तेवढ्यात अक्षय केळकर किरण मानेंना तुम्ही राखीच्या मागे झाडू मारुन दाखवा, असं म्हणतो.

हेही वाचा>> “तुमच्या शरीराची ठेवण…” बोल्ड फोटो शेअर करत प्राजक्ता माळीने दिला हटके सल्ला

राखी यावर उत्तर देत म्हणते, “इथे हे झाडू मारायला नाही, डोळा मारायला आले आहेत”. त्यानंतर किरण माने राखी सावंतचा पदर पकडून संपूर्ण घरात तिच्या मागेमागे फिरताना व्हिडीओत दिसत आहेत. राखी झाडू घेऊन घरात फिरत आहे. किरण माने व राखी सावंतचा हा मजेशीर व्हिडीओ सेलिब्रिटी प्रमोटर्स या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा>> Video: घोड्यावर बसून वाजत गाजत आली राणादाची वरात; लग्न मंडपाच्या बाहेरच वऱ्हाडी मंडळींसह हार्दिकचा तुफान डान्स

हेही पाहा>> Akshya-Hardik Wedding: हातमागावर विणलेली पैठणी, नथ अन् चाफ्याची फुलं; पारंपरिक वेशातील पाठकबाईंच्या मंगळसुत्राने वेधलं लक्ष

राखी सावंतसह, विशाल निकम, आरोह वेलणकर व मीरा जगन्नाथ यांनीही वाइल्ड कार्डद्वारे बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. घरातील समीकरण हळूहळू बदलत असून आता बिग बॉसचा खेळ आणखीनच रंजक होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 19:41 IST
Next Story
Video : मंगलाष्टका झाल्या, खांद्यावर उचलून घेतलं अन् पाठकबाईंनी राणादाच्या गळ्यात हार घालत केलं किस; हार्दिक-अक्षयाच्या लग्नातील खास क्षण