‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अखेर अभिनेता अक्षय केळकर हा बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. तर अपूर्वा नेमळेकरला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. बिग बॉसच्या घरात असताना अक्षय केळकरने त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितले होते.

अक्षय केळकर हा बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर सातत्याने चर्चेत होता. हा खेळाडू वृत्ती, टास्क मधली मेहनत, स्पष्टवक्तेपणा यामुळे त्याने महाराष्ट्राच्या घराघरात एक स्थान निर्माण केले. बिग बॉसच्या घरात गेलेल्या अक्षय केळकरने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गुपित उघड केली. बिग बॉसच्या घरात रंगलेल्या एका टास्कदरम्यान अक्षय केळकरने त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितले होते. त्यावेळी त्याने “माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम आईने जुळवून दिलं होतं” अशी कबुलीही दिली होती.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
IPL 2024 Lucknow Super Gitans vs Gurajat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: चित्त्याच्या चपळाईने बिश्नोईने टिपला झेल, सारेच झाले अवाक; पाहा व्हीडिओ
Hardik Emotional After Third Defeat
MI vs RR : ‘आम्ही लढत राहू आणि पुढे…’, सलग तिसऱ्या पराभवानंतर हार्दिक पंड्याची भावनिक पोस्ट व्हायरल
Rohit Sharma 17 times Golden Duck
MI vs RR : रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, दिनेश कार्तिकसह ‘या’ यादीत पोहोचला पहिल्या स्थानावर

आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : विजेता झाल्यानंतर अक्षय केळकरला लागली लॉटरी, तब्बल ३० लाखांहून अधिक रक्कम मिळणार 

“मी सुरुवातीला खूप लाजायचो. त्यावेळी मी मुलींबरोबर फारसा बोलायचो देखील नाही. त्यावेळी माझ्या नात्यातली एक मुलगी मला सतत मेसेज करत होती. मी ते मेसेजेस इग्नोर करत होतो. त्यावेळी एकदा आईने माझा फोन चेक केला. तिने ते मेसेजस पाहिले आणि आई म्हणाली, ही मुलगी तुला मेसेज करत आहे, तिला तू आवडत असावास. नात्यातील होती म्हणून मी तिच्या घरी राहायला देखील गेलो. आमच्यात बरीच चर्चा झाली. तिने मी तिला आवडत असल्याची कबुली दिली. सगळं छान होतं. पण ते प्रेम टिकलं नाही. ब्रेकअप झाला. पण माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम आईने जुळवून दिलं होतं”, असे अक्षयने त्यावेळी सांगितले होते.

दरम्यान यंदा बिग बॉसमध्ये अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे हे स्पर्धक टॉप ५ स्पर्धक ठरले. यावेळी राखी सावंत ही ९ लाख रुपये घेऊन बिग बॉसच्या स्पर्धेतून बाहेर पडली. त्यापाठोपाठ अमृता धोंगडेंनीही एक्झिट घेतली. त्यामुळे घरात फक्त अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर आणि किरण माने हे तिघेजण टॉप ३ स्पर्धक होते. यानंतर किरण माने हे घराबाहेर पडले. त्यामुळे बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचे टॉप २ सदस्य हे अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर ठरले.

आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : अक्षय केळकर ‘बिग बॉस’चा विजेता ठरल्यानंतर अपूर्वा नेमळेकरची पहिली पोस्ट, म्हणाली…

आता या दोघांमध्ये अक्षय केळकर हा चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली. त्याबरोबर त्याला पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाऊचरही देण्यात आले.