बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकरला ओळखले जाते. तो सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. अक्षय हा अभिनयाबरोबरच उत्तम निवेदनासाठीही ओळखला जातो. नुकतंच अक्षयच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

अक्षयने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो स्वत: गणपतीचं एक सुंदर चित्र रेखाटत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे चित्र काढण्यामागचे कारणही त्याने यावेळी सांगितले आहे.
आणखी वाचा : निवेदिता सराफ यांचे वय किती? स्वत:च खुलासा करत म्हणाल्या, “मला लाज…”

UP Crime Scene
UP Crime : पत्नीच्या लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधामुळे आख्खं कुटुंब उद्ध्वस्त! प्रियकराने एकाचवेळी केली चौघांची हत्या; चिमुरड्या मुलींवरही घातल्या गोळ्या
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Vidhan Sabha Election 2024
अजित पवारांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळविण्यात अडचणी- ज्योतिषांची भविष्यवाणी
tanishk vice president arun narayan
‘नैसर्गिकच्या तुलनेत कृत्रिम हिऱ्यांना अनेकांगी मर्यादा’; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायण यांचे प्रतिपादन
Tourism to Prosperity Nifty India Tourism Index print eco news
पर्यटनातून समृद्धीकडे…:  निफ्टी इंडिया टुरिझम इंडेक्स
Anna Sebastian Perayil, EY,
शहरबात… ॲनाच्या मृत्यूच्या निमित्ताने…
Heart warming video of father and son after passing exam emotional video
“आयुष्यभराचं बापाचं कर्ज, मुठभर गुलालात फेडलं” बाप-लेकाचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांत येईल पाणी
Mercedes-Benz, Supriya Sule, Supriya Sule latest news,
मर्सिडिज बेंझला नोटीस देण्याच्या टायमिंगवर शंका; खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शासनाने…”

अक्षय केळकरची पोस्ट

“आयुष्यात बाप्पाने मला खूप काही दिलं… सुरुवातीला, लहानपणी, चित्र म्हंटलं की मी कायम बाप्पाचं चित्र काढायचो…. after lockdown मी पुन्हा चित्रं काढायला सुरवात केली…माझ्या सगळ्या आवडत्या देवांची मी चित्र काढली आणि बाकीही बऱ्याच concept ची सतत चित्र काढली होतीच… पण जो मला लहानपणापासून सगळं काही देत आला, मोठं झाल्यावर मी त्याचं चित्र काढलंच नाही… आणि आज हे पूर्ण केलंय! आणि पोटात खूsssssप मोठा गोळा आलाय… बाप्पाच्या पोटा पेक्षाही खूप मोठा… कारण… माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट घडणारे… आणि ती ही त्यानेच दिलीय…

आता हे चित्र आयुष्यभर अशा ठिकाणी राहणारे जिकडे मी आतापर्यंत बरंच काही पाहिलंय… पण आता मात्र मी तिथे नसेन… बाप्पा मी तिथून जाणार आहे आणि तू तिथे असशील… ते माझं होतं… कदाचित या साठी माझ्या हातून इतकी वर्ष तुला घडायचं नव्हतं का रे ??? तू मला आता जे काही दिलंयस ना ते खूप आहे…. काळजी घे तुझी … आणि आता तू जिथे असणार आहेस तिथल्या लोकांची आणि माझीही आणि माझ्या लोकांचीही… तुझा अक्षय”, असे अक्षय केळकरने म्हटले आहे.

आणखी वाचा : “…तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं”, अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले “कृपया…”

दरम्यान अक्षय केळकरने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहे. अक्षयच्या या व्हिडीओवर अभिनेत्री सुकन्या मोने यांनी “कित्ती दिवसांनी चित्र काढलं आहेस रे….. फार सुंदर…. गणपती बाप्पा मोरया!” अशी कमेंट केली आहे. तर समृद्धी केळकरने “अक्ष्या” असे कमेंट करत म्हटले आहे. त्याबरोबरच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने “वॉव, एकदम भारी भावा”, अशी कमेंट केली आहे.